महिला सक्षम असतात ते राज्य सक्षम..... दिपक केसरकर
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
महिला सक्षम असतात ते राज्य सक्षम असते आरक्षणाच्या द्वारे महिलांना राज्यकारभार करण्याची संधी दिली आहे. महाराष्ट्रात वडिलांप्रमाणे आईचे नाव देखील लावले जात आहे. असं मत व्यक्त करत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राजे प्रतिष्ठान तर्फे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री केसरकर पुढे म्हणाले जे पुरुष करू शकतात ते आज महिला देखील करू शकतात .सिंधू रत्न योजनेतून मोठा लाभ महिलांना दिला जात आहे. समाजात बदल घडवून आणण्याची ताकद महिलांमध्ये आहे. लाडकी बहीण सारखी योजना महिलांसाठी कार्यान्वित आहे. यापुढेही जाऊन राज्यात महिलांसाठी उपक्रम राबवले जाणार आहेत, असे सांगत उपस्थितांना श्री केसरकर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमदार दीपक केसरकर माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा सत्कार करण्यात आला, तसेच उपस्थित महिलांचा स्त्री नारीशक्ती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर ,सहसचिव कल्याण कदम, खजिनदार ज्ञानेश्वर पारधी संपर्कप्रमुख शिवा गावडे, तालुका अध्यक्षा संचिता गावडे शहराध्यक्ष सेजल पेडणेकर संगीता पारधी ,अंकिता सावंत साक्षी तळवणेकर, प्रणिता सावंत सपना नाईक, जानवी राऊळ रूपाली रेडकर ,सुहासिनी शेट्ये साक्षी गवस ,सुरेखा पवार ,ललिता तोरस्कर, रुक्मिणी चव्हाण. कविता गंगावळकर.आदींसह राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments