मध्ये प्रदेश येथील स्पर्धेसाठी अशोक दाभोलकर-मेस्त्री स्पर्धा निरिक्षक व शशिकांत गवंडे यांना पंच म्हणून आमंत्रित..
नवप्रभात NEWS / मुंबई
मध्य प्रदेशचे विक्रमादित्य अवार्ड विजेते माजी भारतीय शूटिंगबॉल कर्णधार व ड्रॉपबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष श्री. भास्करराव भागवत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २२-२३ मार्च २०२५ रोजी बडनगर, उज्जैन, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय ड्रॉपबॉल (पुरुष/महिला) स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग वेंगुर्ल्याचे अशोक दाभोलकर-मेस्त्री ह्यांची स्पर्धा निरिक्षक व शशिकांत गवंडे ह्यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ह्या स्पर्धेसाठी भारतातील पुरुष व महिला गटात एकूण 20 राज्य सहभागी होत असून दोन्ही गटाला सारखीच म्हणजे अनुक्रमे 51000, 31000, 21000, 11000 व उत्तेजनार्थ 1000, 1000, 1000, 1000, अशी चार बक्षिसे लावण्यात आलेली आहेत.
तसेच दिनांक २१ मार्च २०२५ रोजी बडनगर, उज्जैन येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय पंचशिबिराला अशोक दाभोलकर मार्गदर्शन करतील.
ही माहिती हौशी ड्रॉपबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव महादेव माने (पुणे, महाराष्ट्र) ह्यानी दिली.
Post a Comment
0 Comments