Type Here to Get Search Results !

दलाल डॉक्टरांसह स्थानिक दलालांना आवर घालून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या लोकांवर कारवाई करा.... वेंगुर्ले दाभोली येथील शेतकऱ्यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

दलाल डॉक्टरांसह स्थानिक दलालांना आवर घालून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या लोकांवर कारवाई करा.... वेंगुर्ले दाभोली येथील शेतकऱ्यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी 

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग 

सामायिक जमिनी मिळकतीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वेंगुर्ले दाभोली येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे 

वेंगुर्ले तालुक्यातील येथील भूमापन व उपविभाग क्रमांक 78/1,79/9/10/11अ,79/9/10/11ब,79/9/10/11क या जमीन मिळकती आमच्या सामायिक स्वरूपाच्या असून त्या जमिनी आम्ही कुणालाही विकलेल्या नाहीत असे असून सुद्धा शेख नामक व्यक्तीने सुमारे 40 ते 50 लोकांचा समुदाय करून आमच्या दाभोली येथील सामायिक जमीन मिळकतीमध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांना विचारणा केली असता आम्हाला त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे . सदर जमीन मिळकतीमध्ये गेल्या दीड दोन वर्षांमध्ये बेकायदेशीर जमीन विक्रीचे व्यवहार झालेले असून यामध्ये जमीन खरेदी विक्रीच्या बेकायदेशीर व्यवहारासाठी चर्चेत असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका डॉक्टरचा व पै नामक एका व्यावसायिकाचा हात असून हे दाभोली गावातील बेरोजगारीचा फायदा घेऊन येथील लोकांना आर्थिक आमिषे दाखवून तरुण पिढीला आपल्या दलालीच्या जाळ्यात ओढत आहेत.
देशामध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याचे प्रकार वाढत असतानाच आमच्या दाभोली गावामध्ये देखील अशाच प्रकारे समाजात तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने या दलाल डॉक्टराचे कारनामे सुरू असून आम्हा ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावामध्ये अन्य समाजाला आमच्या जमिनी बेकायदेशीर विकून तेढ निर्माण करणाऱ्या दलाल डॉक्टरांसह सहिस्सेदार व स्थानिक दलालांना आवर घालण्यात यावा.
दाभोली गावातील या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे पंचक्रोशीतील गावामध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 आम्हा स्थानिक शेतकरी कुटुंबाच्या जमीन मिळकतीमध्ये अतिक्रमण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात आहे ही बाब गंभीर असून आम्हा शेतकऱ्यांना धमकी देणाऱ्या शेख नामक व्यक्ती बरोबर मोठ्या संख्येने आलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून आम्हा स्थानिक शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे दाभोली ग्रामस्थ स्मिता देऊ गावडे, चंद्रभागा शिरोडकर, संतोष शिरोडकर, सायली शिरोडकर, विनया गावडे, गणपत गावडे, एकता गावडे, देऊ गावडे, वैभव गावडे आदींच्या सह्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकासह, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments