श्रीदेव कलेश्वर.... त्या नेरूर येथील कलेश्वराच्या प्रांगणात प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही, होळी मांड उत्सव अमाप उत्साहात साजरा
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
कलेचा देव कलेश्वर.... त्या नेरूर येथील कलेश्वराच्या प्रांगणात प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही, होळी मांड उत्सव अमाप उत्साहात साजरा करण्यात आला.
नेरूर सायचे टेंब या ठिकाणी सुप्रसिद्ध होळी मांड उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही शनिवारी रात्री उशिरापर्यंत,सदर मांड उत्सव हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
यात प्रथम ओठ्या ,गा-हाणी झाल्या नंतर, विविध खेळ सादर केले गेले.पौराणिक कथा वर आधारित या भव्य हालत्या देखाव्यांनी , उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
तुफान गर्दीत शिगम्यातील सोंगांनी फेर धरून, रंगत आणली.
स्पर्धेत सहभागी श्री.आना मेस्त्री,व इतर विविध मंडळातर्फे भव्य देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले.
गावडे समाजाचे गोडे रोंबाट,राधा नृत्य, आदींनी रंगत आणली.
राजा सामंत यांनी ओघवते निवेदन सादर केले.
Post a Comment
0 Comments