Type Here to Get Search Results !

कणकवली व देवगड येथे स्पर्धा परीक्षांबाबत २१, २२ रोजी मार्गदर्शन


कणकवली व देवगड येथे स्पर्धा परीक्षांबाबत २१, २२ रोजी मार्गदर्शन

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग 

'तिमिरातुनी तेजाकडे' या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सिंधुदुर्गचे सुपुत्र व सीमाशुल्क विभागात कार्यरत असणारे सत्यवान रेडकर यांच्यावतीने विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
कणकवली तसेच देवगड तालुक्यात २१ व २२ मार्च रोजी स्पर्धा परीक्षांद्वारे करिअर घडवू इच्छिणाऱ्या मुलांसाठी शासकीय स्पर्धा परीक्षेबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

शुक्रवार दि. २१ रोजी सकाळी ८.वा. विद्यामंदिर हरकुळ खुर्द, तसेच शनिवार, दि. २२ रोजी सकाळी ८ वा. कासार्डे माध्यमिक विद्यालय व विज्ञान, कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, कासार्डे, सकाळी ११ वा. न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स, व्होकेशनल, सायन्स फोंडाघाट, सायंकाळी ५ वा. सौ. कमलाबाई वा. पाटणकर शाळा नं १, दाभोळे-देवगड येथे या निःशुल्क व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments