Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मळेवाड शाखा एटीएम् सेंटरचा शुभारंभ

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मळेवाड शाखा एटीएम् सेंटरचा शुभारंभ
 
नवप्रभात NEWS / सावंतवाडी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक, शेतकरी, महिला यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बँकेच्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेत असतांना त्यांनी जास्तीत जास्त डिजिटल बँकींगच्या पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे. महिलांना विविध बँकीग सुविधांचा वापर करत असतांना मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्हा बँकेने बँक सखी सारखी सुविधा उपलब्ध केलेली असून माजी केद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून प्रधानमंत्री पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या शासकिय योजना जिल्हा बँक राबवित असून या योजनांचा फायदा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी करावा यासाठी जिल्हा बँक कायम तुमच्यासोबत राहिल असे अभिवचन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिले. 
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मळेवाड शाखेच्या एटीएम् सेंटरचा शुभारंभ दि. ०३/०३ /२०२५ रोजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते.
एटीएम् सेंटरचे उद्धाटन अध्यक्ष महोदय यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापुन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments