Type Here to Get Search Results !

आंगणेवाडी' जत्रोत्सवासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या ११ फेब्रुवारी पासून आरक्षण सुरू


आंगणेवाडी' जत्रोत्सवासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या ११ फेब्रुवारी पासून आरक्षण सुरू

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रोत्सवासाठी आणखी दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वेने घेतला आहे. क्र. ०११३३/४ ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार आहे. या गाडीचे आरक्षण मंगळवार, ११ फेब्रुवारीपासून खुले होणार आहे.

गाडी क्र. ०११३४ सावंतवाडी रोड -एलटीटी विशेष रविवार, २३ फेब्रुवारीला सावंतवाडी येथून सायं. सहा वाजता निघेल, दुसऱ्या दिवशी स. ६.२५ वाजता एलटीटी येथे दाखल होईल. परतीचा प्रवास (०११३३) एलटीटी येथून स.८.२० वाजता सुरू सोमवारी होऊन सावंतवाडी रोड येथे सायंकाळी ७वाजता पूर्ण होईल.

Post a Comment

0 Comments