सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन....प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याचे आवाहन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गमार्फत २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलें आहे. २०२५ या वर्षातील ही पहिली लोकअदालत आहे.
जिल्हयातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नेमून
घेण्याबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येते. तडजोड होऊ शकणारी व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी २२ मार्चच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवायची असल्यास संबंधित न्यायालयात जाऊन प्रकरण तडजोडीसाठी ठेवायचे आहे.
या लोकअदालतीत दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी, कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे ठेवायची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments