Type Here to Get Search Results !

वायंगणी येथील श्री देव काजरेश्वराचा १० वा वार्षिकोत्सव सोहळा ४ फेब्रुवारी रोजी होणार साजरा


वायंगणी येथील श्री देव काजरेश्वराचा १० वा वार्षिकोत्सव सोहळा ४ फेब्रुवारी रोजी होणार साजरा

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथील श्री देव काजरेश्वराचा १० वा वार्षिकोत्सव सोहळा मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा होत आहे रथसप्तमी या तीथीचे औचित्य साधुन सर्वांचे श्रध्दास्थान नवसाला पावणारा श्री देव काजरेश्वराच्या वार्षिकोत्सव सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या दिवशी सकाळी ८.०० वा. श्री देव काजरेश्वर पुजा होमहवन, अभिषेक, लघुरुद्र होऊन कार्यक्रमास प्रारंभ होईल त्यानंतर सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा ,दुपारी १२.३० वा. श्री सत्यनारायण महाआरती दुपारी १.३०वा. महाप्रसाद सायं.४.००वा. हळदीकुंकू समारंभ सायं.५.०० वा. स्थानिक ग्रामस्थांची भजने सायं.७.००वा. नितीन आसयेकर प्रस्तुत ट्रिक्सीनयुक्त महान पौराणिक नाट्यप्रयोग 'राम भक्त संत कबीर' साजरा होणार आहे तरी भाविकांनी या वार्षिकोत्सवास उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव काजरेश्वर सेवा समिती यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments