Type Here to Get Search Results !

व्यावसायिक घडविण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी युवा पिढीला प्रोत्साहित केले पाहिजे.... अच्युत सावंत भोसले

व्यावसायिक घडविण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी युवा पिढीला प्रोत्साहित केले पाहिजे.... अच्युत सावंत भोसले 

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

चांगल्या दर्जाचे मिनरल वॉटर कोकणात आहे त्यावर प्रक्रिया होऊन मार्केटमध्ये आणणे आवश्यक आहे आणि असे व्यावसायिक घडविण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी युवा पिढीला प्रोत्साहित केले पाहिजे असे मत अच्युत सावंत भोसले यांनी वजराट येथे व्यक्त केले वेंगुर्ले तालुक्यातील वजराट येथील करिष्मा सोनसुरकर यांनी सुरू केलेल्या 'वाघेरी एक्वा' या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
वेंगुर्ले तालुक्यातील वजराट पिंपळगाव येथील करिष्मा सोनसुरकर यांनी सुरू केलेल्या 'वाघेरी एक्वा' या प्रकल्पाचे उद्घाटन भोसले नॉलेज सिटी चे चेअरमन अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वजराट सरपंच
सौ अनन्या आनंद पुराणिक, स्टेट बँकेचे झोनल ऑफिसर परमेश्वर नवघरे, कोकण रेल्वेचे राजु सुरती,वेतोरे मंडल अधिकारी सौ.निगरे , वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता श्री पावसकर, वजराट सोसायटीचे सागर सोनसुरकर, माजी कॅप्टन प्रताप काका राणे,वजराट तलाठी ए. टी. गावडे, प्रदूषण नियंत्रक मंडळाचे साकीब मिर,सामाजिक कार्यकर्ते चंदन गुरव, हर्ष सोनसुरकर व दामोदर सोनसुरकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments