नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कोंडुरा येथील नियमबाह्य रस्त्याच्या कामाला अटकाव करणाऱ्या मच्छीमार - शेतकरी कुटुंबीयांना पालकमंत्री व उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांना सांगून सातबारातील कुळांची नावे नष्ट करण्याची जमीन मालकांकडून धमकी दिली जात असल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले - वायंगणी कोंडुरा येथील गावचे कायम रहिवासी असून गाव मौजे तळेकरवाडी येथील सर्वे नंबर 89/3 व 87/1 या जमीन मिळकती आमच्या सामाईक असून त्यामध्ये आमची पूर्वंपारिक माडबागायती आहे मच्छीमारी मोल मजुरी व या माडबागायतीवरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्वांपार चालत आला आहे.
परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून आमच्या सामायिक असलेल्या कुळपणाच्या जमीन मिळकतीमध्ये रस्त्याच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्या बांधकाम विभागाचे अधिकारी - कर्मचारी बेकायदेशीर रित्या आमच्या माड बागायतीच्या मिळकतीमध्ये मध्ये रस्ता करण्याच्या नावाखाली बेकायदेशीर अतिक्रमण करून आमच्या माड बागायतीचे नुकसान करत आहेत .
आमच्या सामायिक व कुळपणाच्या जमीन मिळकती शासनाने कुठल्याही कायदेशीर बाबींची पूर्तता करून अद्याप पर्यंत आमच्या जमीनी संपादित केलेल्या नाहीत व यापूर्वी देखील आम्ही किंवा आमच्या कुटुंबाकडून कुठल्याही कायदेशीर शासकीय दस्ताने त्या मिळकती आम्ही कुणालाही दिलेल्या नाही व देणार ही नाही असे वारंवार सांगून देखील संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी आमच्याच मिळकतीमध्ये येऊन आम्हाला धमकी देण्याचे प्रकार करत आहेत.
याबाबत या अगोदर देखील सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले होते परंतु त्यावेळी देखील आम्हाला न्याय देण्यात आलेला नाही.
तसेच तत्कालीन पालकमंत्री यांनी सिंधुदुर्गात घेतलेल्या जनता दरबारामध्ये देखील सदर बेकायदेशीर रस्ता कामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते मात्र तेही आदेश अधिकाऱ्यांनी धुडकावून लावले आहेत.
त्यामुळे आमच्या उपजीविकेचे साधन असलेल्या आमच्या माड बागायतीमध्ये आम्ही माड बागायतीच्या मशागतीची कामे करत असताना या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपासून व तेथे वावरणाऱ्या परप्रांतीय कामगारांपासून आमच्यासह आमच्या कुटुंबाला धोका निर्माण झालेला आहे.
तसेच सदर रस्त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा अतिक्रमण हठविण्या बाबत आदेश असल्याचे सांगून बेकायदेशीर पोलीस संरक्षण घेऊन आम्हा मच्छीमार कुटुंबावर दबाव आणला जात आहे.
या ठिकाणी आमच्या वर नमूद सर्वे नंबर च्या मिळकतीमध्ये रस्त्याचे काम करण्याबाबतचे आदेश असल्यास ते आम्हाला दाखवा अशी आम्ही वारंवार त्या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे मागणी करत असताना सुद्धा कोणतीही कायदेशीर कागदपत्रे आमच्या मिळकती संदर्भात अद्याप पर्यंत आम्हाला दिलेली नाही.
ग्रामपंचायत दप्तरी या ठिकाणच्या मूळ रस्त्याची लांबी 1700 मीटर असून त्याबाबतची कागदपत्रे देखील आम्ही वारंवार सर्व कार्यालयांना सादर केलेली आहेत.
मूळ रस्त्याची दिशा बदलून प्रशासनाची व आम्हा मच्छीमार शेतकऱ्यांची कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्याकडून पूर्णता दिशाभूल केली जात आहे.
शासन निर्णय धाब्यावर बसवून मनमानी कारभार करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार शेतकऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने दबाव आणून मनमानी करण्याचा होत असलेला प्रकार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार व शेतकऱ्यांसाठी धोकादायक बनलेला आहे.
आमच्या माड बागायती मध्ये माती टाकून नुकसान केल्या बाबतची वायंगणी तलाठी यांनी पंचयादी देखील घातलेली आहे.
त्यामुळे आमच्या उपजीविकेचे साधन असलेल्या माड बागायती वाचविण्याच्या दृष्टीने आम्हाला योग्य तो न्याय देत सदर बेकायदेशीर रस्ता कामाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अन्यथा पुन्हा 26 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण छेडून आम्हा मच्छिमार कुटुंबांना न्याय मागावा लागेल याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांना लेखी निवेदन सादर केले होते परंतु पालकमंत्री यांनी 25 जानेवारी रोजी घेतलेल्या जनता दरबारामध्ये सदर विषयाबाबत मा. उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांनी लक्ष घालावे असे सांगितले होते त्यानुसार कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी यांनी मीटिंग ठेवली असल्याचे 19 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी आम्हाला दूरध्वनी वरून कळविले परंतु आम्ही बाहेरगावी असल्याने सदर मीटिंगला उपस्थित राहू शकत नसल्याचे मेस्त्री नामक कर्मचाऱ्यांना सांगितले पालकमंत्री यांनी सुचित केलेल्या आदेशाप्रमाणे सदर प्रकरणी नियोजित बैठक ठेवून आगाऊ कळविणे गरजेचे होते परंतु ऐनवेळी बैठक घेऊन आम्ही गैरहजर राहिल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला गेला व जमीन मालक हे आता गावामध्ये पालकमंत्री व उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांना सांगून सातबारातील कुळांची नावे नष्ट करण्याची धमकी देत आहेत.
त्यामुळे सदर सातबारातील आमची नावे बेकायदेशीर रित्या राजकीय दबाव टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी भीती आमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
तरी सदर नियमबाह्य व बेकायदेशीर कामाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी असे वेंगुर्ले कोंडूरा येथील अन्यायग्रस्त शेतकरी नारायण पेडणेकर व प्रशांत पेडणेकर यांनी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे
Post a Comment
0 Comments