Type Here to Get Search Results !

डॉ.तन्वी गोडकर यांच्या एकदन्त दाताच्या दवाखान्याचा वेंगुर्ल्यात शुभारंभ


डॉ.तन्वी गोडकर यांच्या एकदन्त दाताच्या दवाखान्याचा वेंगुर्ल्यात शुभारंभ

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले दाभोली नाका येथील गद्रे नेत्र रुग्णालयात डॉ. तन्वी गोडकर यांच्या एकदन्त दाताच्या दवाखान्याचा शुभारंभ सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेम सावंत-भोसले यांच्याहस्ते करण्यात आला. वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. तन्वी यांना शुभेच्छा दिल्या.

वेंगुर्ल्याच्या नात असलेल्या डॉ. तन्वी यांनी सावंतवाडीतील कळसुलकर हायस्कूलमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर एसपीके कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन डॉ. डी. वाय. पाटील डेन्टल . कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बेंगलोर येथून अॅडव्हान्स डेन्टिस्ट्रीचा कोर्स पूर्ण केला आहे. सावंतवाडी व बेळगाव येथे नामांकित डेन्टल क्लिनीकमध्ये भरपूर काळ अनुभव घेऊन त्यांनी आता आपल्या आजोळी सेवा देण्याचा निर्धार केला आहे. येथील गद्रे नेत्र रुग्णालयात स्वतंत्र कक्षात त्या अत्याधुनिक मशीनरीच्या सहाय्याने रुग्णांची सेवा करणार आहेत. उद्घाटन समारंभाला वेंगुर्त्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ले व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, अॅड. श्याम गोडकर, सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारमल, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, पंचम खेमराजचे निवृत्त प्राध्यापक एम. की. कुलकर्णी, विश्वास जोशी, विजय फातर्पेकर, वेंगुर्ल्यातील संजिवनी रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेश्वर उबाळे, हेमिओपॅचिक मेडीकल कॉलेजचे प्रा. डॉ. संजीव लिंगवत, खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. संजीव चमणकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश नार्वेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विद्याता सावंत, सावंतवाडी व्यापारी संघाचे पदाधिकारी जगदीश मांजरेकर, गद्रे नेत्ररुग्णालयचे उदय दाभोलकर, प्रा. दिलीप गोडकर, सुप्रिया गोडकर, डॉ. वेदांत गोडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. तन्वी गोडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

डॉ. तन्वी या मुळातच अभ्यासात हुशार असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपत्त्या करियरची दीशा निवडताना आपल्याच माणसांची सेवा करण्याचा घेतलेला निर्णय आश्वासक आहे. आजच्या फास्टफूडच्या जमान्यात दातांच्या विविध विकारांमुळे अनेकजन त्रस्त आहेत. वेंगुर्त्यात जाता अत्याधुनिक पद्धतीने परिपूर्ण अनुभव असणाऱ्या डॉ. तन्वी यांच्याकडून उपचार घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. वेंगुर्ल्यासाठी ही गोष्ट खरोखरच उपयुक्त असून वेंगुर्लातील दाताचे रुग्ण त्यांच्याकडून आपुलकीने सेवा घेतील, असे यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले.

विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. सकाळी १० ते सायं. ७ वाजेपर्यंत त्या या दवाखान्यात दंत रुग्णांसाठी वेळ देणार आहेत.

Post a Comment

0 Comments