Type Here to Get Search Results !

"सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्रीम. वर्षा मोहीते तर उपाध्यक्षपदी श्री. दिनेश खवळे यांची निवड "


"सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्रीम. वर्षा मोहीते तर उपाध्यक्षपदी श्री. दिनेश खवळे यांची निवड "

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची सभा नुकतीच  पतसंस्था कार्यालयात मा. श्री.श्रीकृष्ण म. मयेकर अध्यासी अधिकारी मुख्य लिपिक अधिन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यात अध्यक्षपदासाठी श्रीम. वर्षा ब.मोहीते व श्री. बाळकृष्ण तु. रणसिंग यानी उमेदवारी अर्ज दाखल केले व उपाध्यक्ष पदासाठी श्री. दिनेश प.खवळे व श्री. अमित मो. गंगावणे यानी उमेदवारी अर्ज दाखल केले सदर अर्ज वैध ठरलेनंतर गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या अध्यक्षपदाचे निवडणुकीमध्ये श्रीम.वर्षा ब. मोहीते याना १० मते तर श्री. बाळकृष्ण तु. रणसिंग याना ५ मते मिळाली तसेच उपाध्यक्षपदाचे निवडणुकीमध्ये श्री. दिनेश प. खवळे याना १० मते तर श्री. अमित मो. गंगावणे याना ४ मते मिळाली? मत अवैध झाले त्यामुळे संस्थेचे अध्यक्षपदी श्रीम. वर्षा ब. मोहीते व उपाध्यक्षपदी श्री. दिनेश प. खवळे यांची निवड झालेचे अध्यासी अधिकारी मा. श्री. श्रीकृष्ण म. मयेकर यांनी घोषित केले.

सदरहू सभेला संस्थेचे संचालक श्री. कृष्णा म. आडणेकर, श्री. राजेश ता. चव्हाण, श्रीम. अनघा अ. तळावडेकर श्री.वासुदेव वि, वरवडेकर, श्री. वंदन वि. गावडे, श्री. देविदास ल. आडारकर, श्री. चेतन सु. गोसावी, श्री. प्रविण म. सावंत, श्री. राजेद्र वि. शिंगाडे, श्री. विलास मो. चव्हाण श्री राजन ग. साळुंखे व संस्थेचे सचिव श्री. निलेश ज. कुडाळकर उपस्थित होते.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड झालेनंतर सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच कर्मचारी वृंदाच्या वतीने सचिव श्री. निलेश ज. कुडाळकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

मा श्रीम.वर्षा ब.मोहीते व श्री. दिनेश प. खवळे यांनी प्रस्तुतच्या निवडीबाबत सर्व संचालक मंडळाचे आभार मानून सर्वाच्या सहकार्याने संस्थेच्या प्रगतीला हातभार लावू अशी ग्वाही दिली. त्यानंतर मा. अध्यासी अधिकारी श्री. श्रीकृष्ण म. मयेकर साहेब यांनी सभा संपलेचे जाहीर केले.

Post a Comment

0 Comments