Type Here to Get Search Results !

राधारंग फाउंडेशनची हाफ मॅरेथॉन उत्साहात संपन्न


राधारंग फाउंडेशनची हाफ मॅरेथॉन उत्साहात संपन्न 

नवप्रभात NEWS  / कुडाळ 

राधारंग फाउंडेशनची RRF HALF MARATHON 2025 परुळे येथे उत्साहात पार पडली. परुळे युवक कला क्रीडा मंडळाकडून या मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनचे हे ४ थे वर्ष होते. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील मिळून ५०० जणांनी यामध्ये सहभाग नोंदवला.ज्यामध्ये ६ वर्ष ते ८० वर्ष अश्या सर्व वयोगटातील व्यक्तींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.श्री. रणजित देसाई, सचिन देसाई, कुशेवाडा सरपंच श्री. निलेश सामंत, स्टेट बँक परुळे शाखाधिकारी श्री. सिद्धार्थ बांदेकर, राधारंगचे रवींद्र सरनाईक या मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरवात करण्यात आली.

लक्ष्मी नारायण पेट्रोलियम कुडाळ, एस पी बोअरवेल कणकवली, वेतोबा पेट्रोलियम परुळे, जी. टी. राणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेन्टर कुडाळ, सारस्वत बँक शाखा कुडाळ, स्टेट बँक शाखा परुळे यांनी या मॅरेथॉनचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. 
जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे च्या दोन सुसज्ज रुग्णवाहीका यावेळी पूर्णवेळ उपलब्ध होत्या.तसेच सर्व सहभागीना बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कुडाळ च्या टीमने विनामूल्य फिजिओथेरपी सेवा दिली.

यावेळी मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ओंकार पराडकर, प्रकाश चव्हाण, कबीर हेरेकर, सुषमा परुळेकर यांचा राधारंग फाउंडेशन कडून सत्कार करण्यात आला.यावेळी राधारंग फाउंडेशन आणि परुळे युवक कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments