मनोज देसाई
नवप्रभात NEWS
मोबाईल मुळे विद्यार्थ्यांचे निसर्गाचे नाते तुटत चालले आहे. मोबाईल मुळे आजूबाजूचा निसर्ग बघण्यासाठी ही वेळ मिळत नाही ही आज शहरात नाही तर खेड्यातील मुलांची अवस्था आहे .अशासाठी निसर्गाची ओढ लागावी कांदळवनाची व्यवस्थित माहिती व्हावी ,पक्षी निरीक्षण कसे करावे याबाबत माहिती घेण्यासाठी कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग कांदळवन बचाव प्रकल्प समन्वयक श्रीमती जागृती वासुदेव गवंडे ,त्याचप्रमाणे श्री नीरज धनंजय कोरगावकर यांच्या माध्यमातून पाट हायस्कूलच्या भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांची कांदळवन सफारी काढण्यात आली .यावेळी पंचवीस विद्यार्थ्यांचे अभ्याससोबत पर्यवेक्षक श्री सयाजी बोंदर कलाशिक्षक श्री संदीप साळसकर उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन ओम साई निसर्ग पर्यटन बचत गट मार्फत करण्यात आले .निवती येथील बचत गटामार्फत सौ मनाली आरोलकर यांनी कांदळ वृक्षांचे प्रकार व त्यांचे महत्त्व यांची माहिती दिली. त्यांचे औषधी उपयोग ,परिसंस्था, याबाबतही माहिती दिली त्याच प्रमाणे श्रीमती जागृती गवंडे यांनी पक्षी विषयक विस्तृत माहिती दिली .या निसर्गाकडे वळा उपक्रमाचे कौतुक सर्व संस्था संचालक तसेच मुख्याध्यापक श्री राजन हंजनकर यांनी कौतुक केले.
Post a Comment
0 Comments