श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिव्हाळा सेवाश्रमाचा ९ वर्धापन दिन संपन्न
नवप्रभात NEWS
श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी, रायवाडी चा नऊ वा वर्धापन दिन अन्वेष संजय बिर्जे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन नुकताच साजरा झाला.
सदरचा कार्यक्रम हा विविध अशा उपक्रमाने साजरा करण्यात आला.यावेळी लाभार्थीना फळ वाटप केले. व पंचक्रोशितील महीला साठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला
त्यानंतर श्री योगेश प्रभु व त्यांच्या शिष्यांनी सुगम संगीताचे गायन केले.
तसेच श्री आनंद मोर्य यांचे शिष्य यांचा सोलो वादन कार्यक्रम संपन्न झाला.
संध्यांकाळी सात वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी पुरस्कार प्रदान सोहळा साजरा झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा० श्री. दत्ताजी सामंत उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. हे पुरस्कार दत्ताजी सामंत , केंद्रप्रमुख उत्तम हरमळकर , बालकलाकार आरव आईर, मालवणी भाषा तसेच इतर प्रबोधन करणारे सहदेव धर्णे , एस .आर .एम . काॅलेजचे प्रा. प्रशांत केरवडेकर, तसेच मालवणी बायल माणूस निशा आजगावकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला..या शुभ प्रसंगी श्री माड्याचीवाडी सरपं विग्नेश गावडे, सौं- अस्मिता गावडे (उपसरपंच), श्री. चंद्रशेखर परब ( पोलिस पाटील), श्री. दिपक पाटकर माजी नगर सेवक - -मालवण , उमेश देसाई, श्री सुरेश गोपाळ गावडे - दोडामार्ग, स्मिताली गावडे, सौ: संजना सरमळकर ,बचत गट प्रमुख , पोलिस उपनिरिक्षक निवती श्री. नितीन पाटील, पो-उपनिरीक्षक श्री दिलीप शेट्ये , पोलिस अंमलदार नितीन शेडगे , जिव्हाळा सेवाश्रम अध्यक्ष सुरेश बिर्जे , उपाध्यक्ष श्री राजू बिर्जे, , सुंदर मेस्त्री, श्री बाबिदास गावडे , जयप्रकाश प्रभू, नाना राऊळ, शोभा बिर्जे ,साक्षी बिर्जे, पुनम बिर्जे, दत्तात्रय पाटकर, दिपाली पाटकर , गितांजली बिर्जे तसेच गुरुवर्य योगेश प्रभू, गुरुवर्य आनंद प्रभू , एस आर एम काॅलेजच्या च्या प्राध्यापिका यशश्री नरसिंह प्रभू, मिताली संतोष गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच संगित कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना आश्रमातर्फे भेटवस्तू देण्यात आले.
यावेळी अन्वेष संजय बिर्जे याचा वाढदिवस साजरा करण्यात आला..वाढदिवसा प्रित्यर्थ बिर्जे कुटुंबियांकडून लाभार्थ्यांसाठी फळवाटप तसेच स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली..
सचीन फणसेकर यांनी स्वयंपाक सेवा केली. त्यानंतर कराओके वर सदाबहार गाण्याचा कार्यक्रम योगेश प्रभू आणि शिष्य यांनी सादर केला
.या वेळी या कार्यक्रमाला आवर्जून मुंबईतून उपस्थित श्री. कुडाळकर, यांनी कराओके वर गाणं सादर केले ,भाई साटेलकर , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बिर्जे , संदिप बिर्जे ,आर्या बिर्जे, स्वरा बिर्जे, सुमेध बिर्जे, श्रेया बिर्जे, विवेक पाटकर ,राधिका बिर्जे उपस्थित होते
. प्रस्तावना सुंदर मेस्त्री यांनी केली ,सुत्रसंचलन संतोष सांगळे व प्राजक्ता परब यांनी केले तर आभारप्रदर्शन जयप्रकाश प्रभू यांनी केले.
Post a Comment
0 Comments