Type Here to Get Search Results !

वेंगुर्ला न.प तर्फे उद्या भव्य बीच व्यायाम प्रशिक्षण शिबीराचे आयोजन


वेंगुर्ला न.प तर्फे उद्या भव्य बीच व्यायाम प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

स्वच्छता अभियान मध्ये राष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक प्राप्त वेंगुर्ला नगर परिषद वेंगुर्ला यांच्या वतीने स्वच्छ वेंगुर्ला फिट वेंगुर्ला या अभियान अंतर्गत युवक शरीर सौष्ठव संवर्धन संस्था श्री सातेरी व्ययाम शाळा वेंगुर्ला सोन् सुर कर फिटनेस शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने व्यायाम प्रसार अभियान अंतर्गत वेंगुर्ल्यातील नागरिकांना व्यायामची आवड निर्माण होऊन त्याचे महत्व लक्षात यावे यासाठी वेंगुर्ला तील निसर्गरम्य जलबांदेश्वर झूलता पूल येथे अतिशय आगळं वेगळा व्यायाम शिबीर उपक्रम रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत आयोजित केला आहे.शालेय विद्यार्थी, युवक, प्रौढ, जेष्ठ नागरिक यांचे साठी हा उपक्रम खुला राहील.
वेळ सकाळी 
7 ते 7.10 नाव नोंदणी 

 सकाळी
 7. 10 ते 7.30 योगभ्यास 
 7.30 ते 8.00 वॉर्मअप व ऐरोबीक 
  8.00 ते 9.00 विविध मनोरंजक वाळूतील खेळ व सर्किट ट्रेनिंग ऍक्टिव्हिटी 

9 ते 9.30 समारोप व अल्पपोपहार 
वरील संपूर्ण कार्यक्रम साठी अंतर राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग खेळाडू श्री किशोर शांताराम सोन्सूरकर सर व त्यांचे सहकारी प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत 
सदर उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी श्री पारितोष कंकाळ यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments