मानसीश्वर जत्रौत्सवा निमित्त मानसीश्वर ट्रस्ट वेंगुर्ला
व डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय वेंगुर्ला यांच्या संयुक्त विदयमाने 5 फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
व डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय वेंगुर्ला यांच्या संयुक्त विदयमाने महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत
कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत करण्यात आले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सोडून बाकी सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या सुविधा सर्व रेशन कार्ड धारकांसाठी उपलब्ध असून माफक दरात मशिनी द्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप करण्यात येणार आहे
वेंगुर्ले उभादांडा येथील मानसीश्वर पेट्रोल पंपा शेजारी आयोजित करण्यात आलेल्या या मोफत नेत्र तपासणी शिबिरास रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मानसीश्वर ट्रस्ट वेंगुर्ला व विलास कुबल यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments