Type Here to Get Search Results !

खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठी ऑनलाईन अर्जाचे आवाहन


खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठी ऑनलाईन अर्जाचे आवाहन

नवप्रभात NEWS/ ओरोस 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार सन २०२४-२५ पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व खेळाडू विद्यार्थी, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले सरकार पोर्टलवर यावर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

पोर्टलवर सर्व अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास सादर करण्याची सुविधा संबंधित

विद्यार्थ्यांसाठी निर्माण करून देण्यात आली आहे. खेळाडू विद्यार्थी, जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी aaplesarkar.mahaonline.g ov.in या लिंकच्या माध्यमातून आपले सरकार अॅपद्वारे सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.

खेळाडूने जिल्हा क्रीडा कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू नये. असा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाऊ नये, असे निर्देश संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी शीतल शिंदे (९२०९१३४४३४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments