महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक श्री.मनोज रानडे भा.प्र.से व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मकरंद देशमुख भा.प्र.से यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेस दिली सदिच्छा भेट
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या तसेच राज्यस्तरीय माझी वसुंधरा अभियान, शहर सौंदर्यीकरण अभियान अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणा-या वेंगुर्ला नगरपरिषदेस रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक श्री.मनोज रानडे व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.मकरंद देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली.
वेंगुर्ला नगरपरिषदेस माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत कोकण विभागात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त झालेले होते. तसेच रक्कम रुपये एक कोटीचे बक्षिस देखिल प्राप्त झाले होते. या रक्कमेतुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन त्यानुसार विविध नाविन्यपुर्ण उपक्रम साकरण्यात येत आहेत. यानुसार वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कंपोस्ट डेपो) येथे माझी वसुंधरा अभियानाबाबत जननजागृती करण्यासाठी व पंचमहाभुतांची प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी नगरपरिषदेमार्फंत आकर्षक शिल्पाकृती (Promulagation Point) उभारण्यात आलेली आहे. या शिल्पाकृतीचे लोकार्पण मा.आयुक्त श्री.मनोज रानडे यांच्या हस्ते करण्यात आले.
तद्नंतर वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फंत जवळपास २७०० देशी प्रजातीच्या रोपांची लागवड करुन नव्याने विकसित करण्यात आलेल्या मियावाकी वनाचे उद्घाटन व लोकार्पण मा.श्री.मकरंद देशमुख यांचेमार्फत करण्यात आले. याठिकाणी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण करुन हवामान बदल मर्यादित करण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या बांबु, शेवगा, खस या प्रजातीच्या १५०० रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. तसेच बदाम, सोनचाफा, जांभुळ, पारिजातक, रातराणी, बकुळ, सप्तपर्णी अशा विविध देशी प्रजातीच्या १२०० रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. तसेच याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आठवण म्हणुन वृक्षारोपण करण्यात आले.
तद्नंतर मान्यवरांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मिरॅकल पार्क, सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन प्रकल्प यांची पाहणी केली. वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फंत मृत जनावरांना जाळण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या शवदाहिनी केंद्रास भेट दिली. तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फंत नव्याने विकसित करण्यात आलेल्या फुलपाखरु उद्यानाची पाहणी केली. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कंपोस्ट डेपो) येथील Waste to Best संकल्पनेनूसार विकसित करण्यात आलेल्या Miracle Park या ठिकाणांना भेट दिली. कच-यातील टाकावू वस्तुंचा वापर करुन नाविन्यनपूर्ण कलाकृती बनवून वेंगुर्ला नगरपरिषद आपले वेगळेपण जपत आहे. वेंगुर्ला नगरपरिषद ही शाश्वत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासोबत परिपुर्ण अर्थव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फंत राबविण्यात येणारे शुन्य कचरा (Zero Waste) मॉडेल आदर्श मानुन इतर नगरपरिषदांनी या प्रकल्पाचे अनुकरण करावे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले व वेंगुर्ला नगरपरिषदेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments