केंद्र सरकारने कामगार कर्मचारी विरोधी 4 संहिता तातडीने रद्द कराव्यात... कॉ विजयाराणी पाटील.
वेंगुर्ला तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक यांचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ला तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक यांचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच वेंगुर्ले पार पडले. या अधिवेशनात संघटनेच्या गेल्या तीन वर्षातील संघटनात्मक व आंदोलनात्मक कामकाजाचा अहवाल सुरुवातीला जिल्हा सचिव कॉ विजयाराणी पाटील यांनी मांडला. त्यांनी संघटनेच्या पीएचसी, तालुका स्तरावरील व जिल्हा आणि राज्य स्तरावरील कामकाजाची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी गेल्या तीन वर्षातील जमाखर्च अधिवेशनात मांडला. याद्वारे संघटनेच्या कामकाजातील पारदर्शकपणा व काटकसर त्यांनी सभासदांसमोर ठेवला.
त्यानंतर युनियनच्या अध्यक्षा कॉ प्रियांका तावडे यांनी गेल्या तीन वर्षातील आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांसाठी केलेली विविध आंदोलने व प्रत्येक आंदोलनातून मिळालेले ठळक यश याची माहिती दिली. आशा व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढेही असेच संघटित राहा असे आवाहन केले.
त्यानंतर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन प्रतिनिधी निवडून खालीलप्रमाणे तालुका कमिटी तयार करण्यात आली व नवनियुक्त तालुका कमिटीतून तालुका पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली. पुढील तीन वर्षासाठी युनियनचे कामकाज पाहण्यासाठी जबाबदारी तालुका कमिटीकडे देण्यात आली.
अध्यक्ष: रक्षिता गोवेकर (परुळे), सचिव: वर्षा परब (आडेली), खजिनदार: राजश्री पालकर (तुळस), तर तालुका कमिटी सदस्य: सुनिता परब व साक्षी घाडी (तुळस), प्राजक्ता धुरी व शुभांगी मुणनकर (आडेली), साक्षी राऊळ व संगीता शिंत्रे (परुळे). तर रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तीन पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
अधिवेशनामध्ये आशा व गटप्रवर्तक यांच्या खालील मागण्यांचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले:
1. आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करा.
2. आशा व गटप्रवर्तक यांना सामाजिक सुरक्षा योजना म्हणून पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी, इत्यादी सुरू करा.
3. आशा व गटप्रवर्तकांना राज्य सरकारने चांगल्या दर्जाचा अँड्रॉइड स्मार्टफोन द्यावा व इंटरनेट रिचार्ज साठी दरमहा 500 रुपये भत्ता द्यावा.
4. आशांना किमान 26000 व गटप्रवर्तकांना किमान 28000 रुपये मासिक वेतन सुरू करा.
5. देशातील महिलांना अन्याय व अत्याचारापासून संरक्षण देणारे कठोर कायदे करावेत व त्या कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी.
6. केंद्र सरकारने देशात लागू करण्यात आलेल्या कामगार विरोधी 4 संहिता तातडीने रद्द कराव्यात.
सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन सीटू संलग्न
वेंगुर्ला येथे उत्साहात पार पडलेल्या या अधिवेशनात तुळस आडेली व परुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 50 आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.
Post a Comment
0 Comments