श्री.देवी सातेरी सार्वजनिक वाचनालय वेतोरेच्या वतीने चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा संपन्न
श्री.देवी सातेरी सार्वजनिक वाचनालय वेतोरेच्या वतीने केंद्र शाळा वेतोरे नं. १ येथे चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन केंद्र प्रमुख नितीन कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिक्षक पालक समिती अध्यक्ष आरती शेणवी, मुख्याध्यापक उदय गोसावी, वाचनालयाचे अध्यक्ष विवेक गोगटे, शिक्षक मंगेश तेंडुलकर,राजन राठोड, शिक्षिका अर्चना बर्डे, शिक्षक अभिषेक राऊळ, शिक्षिका नम्रता गोसावी, उपाध्यक्ष राधाकृष्ण वेतोरकर, कार्यवाह चारुशीला वेतोरकर, सदस्य दिपक नाईक, संदेश राऊळ, वाचनालयाचे कर्मचारी वर्ग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.सदर स्पर्धा प्रथम गट १ली ते २री, द्वितीय गट ३री ते ४थी आणि तृतीय गट ५वी ते ७वी अशा तीन गटांमध्ये घेण्यात आली.या स्पर्धेला विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Post a Comment
0 Comments