जिव्हाळा सेवाश्रमाच्या माध्यमातून कुडाळ - पिंगुळी येथे स्वच्छता अभियान संपन्न
नवप्रभात NEWS / कुडाळ
कुडाळ तालुक्यातील जिव्हाळा सेवाश्रमाच्या माध्यमातून अरुणोदय मेटल कंपनी ते राऊळ महाराज मठ मार्गाची स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. प्रत्येक महिन्यातील एक दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष राजू बिर्जे यांनी सांगितले... स्वच्छता अभियान राबवून तरी लोकांना जाग येईल.. त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले जाणार नाही.. यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे... पुढच्या स्वच्छता अभियानात उस्फुर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे...या स्वच्छता अभियान संस्था उपाध्यक्ष राजू बिर्जे, संजय बिर्जे , संदिप बिर्जे, दत्तात्रय पाटकर, दिपाली पाटकर, गितांजली बिर्जे, बाबीदास गावडे, जयप्रकाश प्रभू, उत्तंम परुळेकर, रामचंद्र परब, कौस्तुभ सांगळे, सुमेध सांगळे, रामचंद्र तुळसकर, उत्तंम परुळेकर, मयुरेश खरात, प्रकाश जाधव , पुनम बिर्जे, संतोष सांगळे..आदी लोक उपस्थित होते...साथिच्या रोगाला आळा घालायचा असेल तर स्वच्छता फार महत्त्वाची आहे..या साठी प्रत्येक नागरिकाने या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे.असे आवाहन संस्था अध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी केलं आहे
Post a Comment
0 Comments