Type Here to Get Search Results !

पाट हायस्कूलमध्ये कोल्हापूरच्या प्रसिद्ध चित्रकार सन्मा जगताप मॅडम यांचे कलाविषयक मार्गदर्शन .


पाट हायस्कूलमध्ये कोल्हापूरच्या प्रसिद्ध चित्रकार सन्मा जगताप मॅडम यांचे कलाविषयक मार्गदर्शन .

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

पाट हायस्कूल मध्ये कै .मा. एकनाथजी ठाकूर कला अकादमी मध्ये कलाविषयक विविध उपक्रम राबविले जातात. कलाविषयक रुची असणाऱ्या मुलांना खास मार्गदर्शन केले जाते .यावेळी कोल्हापूरच्या प्रसिद्ध चित्रकार सन्मा अस्मिता जगताप मॅडम यांनी कालादालनमध्ये भेट दिली. मुलांच्या कलाकृतींचे कौतुक केले त्यांना पेन्सिल स्केचही काढून दाखवल्या आणि कलाच्या क्षेत्रात दहा वर्षात जे आमुलाग्र बदल झाले त्याची माहिती दिली पुढील काळात होणाऱ्या बदलाचे कल्पनाही दिले आणि त्याबद्दल मार्गदर्शन केले .
आजच्या धकाधकीच्या युगात कलेचे महत्त्व काय आहे कलाक्षेत्रातील आपल्या मुलांच्या यशोगाथाही सांगितल्या. सन्माननीय जगताप मॅडम यांच्या कलाकृतीचे कोल्हापूर शाहू स्मारक तसेच मुंबई पुणे येथेही प्रदर्शन झालेले आहे. कोल्हापूरच्या दळवी आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलेले आहे त्यामुळे त्यांचा कलाक्षेत्रातील मोठा अनुभव आहे. त्यामुळे असे मार्गदर्शन मुलांना प्रेरणा देतात मॅडमचा शाल श्रीफळ देऊन कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी सत्कार केला. यावेळी माजी विद्यार्थी आणि शिक्षक श्री विनोद मेतर श्री .रवी हिंदणे सौ .मिनल दिघे पुणे मुख्याध्यापक श्री. राजन हंजनकर पर्यवेक्षेक श्री बोदर सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments