शिवजन्मोत्सवानिमित्त 17 फेब्रुवारी रोजी आरवली टांक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
मंडळ आरवली टांक दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असते. यावर्षीही भव्य रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आले आहे.
यंदा या उपक्रमाचं तिसरे वर्ष असून इच्छुक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय.
गेल्या दोन वर्षापासून शिवप्रेमी मित्र मंडळ कडून रक्तदान शिबीर घेण्यास सुरुवात झाली आहे. सोमवार दिनांक 17 फेब्रुवारीला या शिबीराचं आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत रक्तदान करता येणार आहे. मारुती मंदिर टांक येथे हे शिबीर होणार आहे आरवली टांक येथे शिवप्रेमी मित्र मंडळाच्यावतीने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा होतो. गेल्या 4 वर्षांपासून हे मंडळ विविध कार्यक्रम राबवत याचंच औचित्य साधत हे मंडळ सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. त्यांच्या या उपक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या इच्छुक रक्तदात्यांनी 7588958080 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments