Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले तालुक्याच्या जडणघडणीत पत्रकारांचेही मोठे योगदान ... मनिष दळवी


वेंगुर्ले तालुक्याच्या जडणघडणीत पत्रकारांचेही मोठे योगदान ... मनिष दळवी

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

इतरांमध्ये फारसा न मिसळणारा, मेहनती व स्वाभीमानी पत्रकार वेंगुर्ल्यात बघायला मिळतो. त्यामुळे वेंगुर्त्याची पत्रकारिता निकोप आणि निर्भिड असल्याचे पहायला मिळते. वेंगुर्ले तालुक्याच्या जडणघडणीत पत्रकारांचेही मोठे योगदान आहे. वेंगुर्ल्यातील पत्रकारांनी अधिक जोमाने समाजोपयोगी पत्रकारिता करावी, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी वेंगुर्ले येथे केले.
  येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. वेंगुर्ले तालुका पत्रकार संघातर्फे घोषित करण्यात आलेल्या पत्रकार स्व. संजय मालवणकर व अरुण काणेकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कारांचे यावेळी यावेळी वितरण करण्यात आले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा बॅ. नाथ पै समुदाय केंद्राचे समन्वयक सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य दिलीप गिरप, वेंगुर्त्याचे तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ले नगर पालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल, माझा वेंगुर्ला संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले, वेताळ प्रतिष्ठान तुळसचे सचिव प्रा. सचिन परुळेकर, शिवसनेचे तालुका प्रमुख नितीन मांजेरकर, शिवसेनेचे शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक उमेश येरम, ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब, आनंदयात्री वाङमय मंडळाच्या अध्यक्ष वृंदा कांबळी, आधार फाऊंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
    सन २०२४ चा संजय मालवणकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार तरुण भारतचे जाहीरात प्रतिनिधी प्रदीप सावंत यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अरुण काणेकर स्मृती आदर्श पत्रकार अजीत राऊळ यांना जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. २०२५ सालचा संजय मालवणकर स्मृती पुरस्कार सुनील मराठे यांना तर अरुण काणेकर स्मृती पुरस्कार परुळे येथील शंकर घोगळे यांना एम. के. गावडे आणि दिलीप गिरप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हा पत्रकारसंघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त तरुण भारतचे पत्रकार भरत सातोस्कर यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
   वेंगुर्ले येथून पत्रकारितेची सुरुवात करून कुडाळमधून सेवानिवृत्त झालेले तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत, जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, अरुण काणेकर यांचे सुपुत्र अमृत काणेकर, महाराष्ट्र शासनाच्या
   मराठी भाषा संचालनालयाचे पर्यवेक्षक अभयराजे कुलकर्णी व अधीक्षक दशरथ नाईक वेंगुर्ल्यातील पत्रकारांनी आपल्या नावाला बट्टा लागेल असे काम कधीच केले नाही. किंवा मॅनेज पत्रकारितेचा पायंडा पडू दिलेला नाही. त्यामुळे सगळेच पत्रकार सन्मानास पात्र आहेत. वेंगुर्ल्यातील पत्रकारांचा त्रास कधी कोणाला नसतो, पण वाईट गोष्टींवर तुटून पडण्यासही वेंगुर्ल्यातला पत्रकार घाबरत नाही. त्यामुळेच धडाडीचे पत्रकार वेंगुर्ल्यात घडू शकले. अशा श्रेष्ठ पत्रकारांचा वसा वेंगुर्ल्यातील पत्रकारांनी पुढे चालवावा, असे यावेळी बोलताना सचिन वालावलकर म्हणाले.
   पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील बऱ्या वाईट घटना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी तो आपले कसब वापरतो. प्रत्येकाची लिखाणाची स्टाईल वेगळी असली तरी खरी बातमी वाचकांपर्यंत पोहोचविणे हे त्याचे कर्तव्य असते. वेंगुर्ल्यातील पत्रकारांनी हे व्रत सांभाळले आहे. तालुक्याच्या विकासासाठी आव -त्र्मकता दाखवताना आपल्या धारधार लेखनीचा प्रभाव त्यांनी दाखवून द्यावा, असे एम. के. गावडे म्हणाले. तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ले पालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, संजय पुनाळेकर, जयप्रकाश चमणकर, नम्रता कुबल, दिलीप गिरप, नंदन वेंगुर्लेकर आदी मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात उमेश तोरसकर यांनी वेंगुर्ल्यातील पत्रकारितेविषयी विवेचन करतानाच जिल्हा पत्रकारसंघातर्फे सुरू असलेल्या कार्याचा उल्लेख केला. सन्मानमूर्ती प्रदीप सावंत यांनी सत्काराला उत्तर दिले.
   समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष सुहास कोळसुलकर, क्रीडा प्रशिक्षक जयराम वायंगणकर, सत्यवान साटेलकर, प्रा. डॉ. सुनील मिसे, प्रा. वामन गावडे, प्रा. वसंतराव पाटोळे, महेश राऊळ, कृषी सहाय्यक लाडू जाधव, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटेनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय आदी यावळी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सिमियन कार्डोज, सचिव विनायक वारंग, उपाध्यक्ष योगेश तांडेल, खजिनदार प्रथमेश गुरव, सदस्य दाजी नाईक, दीपेश परब, के. जी. गावडे, भरत सातोस्कर, एस. एस. धुरी यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष महेंद्र मातोंडकर यांनी केले. तर आभार दीपेश परब यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेंगुर्ले हायस्कूल, वें. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, पत्रकार संघाचे सदस्य, तसेच विविध राजकीय पक्षांचे सहकार्य लाभले

Post a Comment

0 Comments