वेंगुर्ले साई मंदिर वर्धापन दिन ३०, ३१ जानेवारी रोजी
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
राज्य परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ले बस स्थानकावरील श्री साई मंदिराचा २८ वा वर्धापन उत्सव ३० व ३१ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार आहे.
त्यानिमित्त बुधवार २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. श्री स्वामी समर्थ पालखी व पादुका आगमन व दर्शन सोहळा, सायंकाळी ७ वाजता भजन व आरती, सायंकाळी ८ वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली यांचा नाट्यप्रयोग, गुरुवार ३० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता संप्रोक्षण विधी व महारुद्र जपानुष्ठान, सकाळी ८ वाजता गणेश पूजन व धार्मिक विधी, सकाळी ८.३० वाजता शहरात श्री साईची पालखी मिरवणूक, दुपारी ३ वाजता हळदीकुंकू, ३.३० वाजता रामेश्वर बाल फुगडी, वेंगुर्ले यांची फुगडी, सायंकाळी ४ वाजता जैतीर कृपा संगीत मंडळ, तुळस यांच्या गायनाचा
कार्यक्रम, सायंकाळी ४.३० वाजता सद्गुरु संगीत विद्यालय, आरवली यांचे भजन, सायंकाळी ५ वाजता एसटी कर्मचाऱ्यांचे भजन, ६ वाजता स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ कलंबिस्त यांचे भजन, पालखी मिरवणूक, रात्री ८.३० वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग, ३१ रोजी ८ वाजता महारुद्र जप सांगता, १० वाजता श्री साईबाबांची महापूजा, सकाळी ११ वाजता महाआरती व महानैवेद्य, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, ४ वाजता श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, सुरंगपाणी यांचे भजन, सायंकाळी ५ वाजता श्री ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ, तेर्सेबांबर्डे यांचे भजन, सायंकाळी ६ वाजता सदाबहार सादरकर्ते कार्यक्रम, अरुण गोंडळकर, (भेडशी-दोडामार्ग), सायंकाळी ७ वाजता महाआरती, ७.३० वाजता साईंची पालखी, रात्री ८.३० वाजता डबलबारी सामना, बुवा श्रीकांत शिरसाट विरुद्ध बुवा अरुण घाडी यांच्यात होणार आहे.
Post a Comment
0 Comments