उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
कसाल कुंभारवाडी कुंभार समाजबांधव व समाजातील ज्येष्ठ मित्रमंडळी एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाजचे माजी युवा अध्यक्ष श्री सुरेश नांदिवडेकर यांना त्यांच्या सामाजिक कार्य , उद्योजकता व इतर कामांची दखल घेऊन Global Human Peace University virtual यांचे कडून Honorary Degree of Doctor of Management and Social service ही पदवी प्रदान करण्यात आली त्याबद्दल व कसाल कुंभारवाडी मधील मान श्री. उत्तम मळगावकर सर यांची कसाल हायस्कूल मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्या बद्दल ह्या कुंभार समाजातील दोन समाजरत्नाचा श्री संत गोरोबा काका प्रतिमा शाल व श्रीफळ देऊन समाजातील जेष्ठ बांधवांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी कुंभार समाजातील जेष्ठ मंडळी श्री. विलास गुडेकर, श्री. दिलीप हिंदळेकर , श्री. आनंद कुंभार ,श्री. चंद्रकांत कुंभार , श्री महेश कुंभार ,श्री. गणपत शिरोडकर , श्री. सुहास पिकुळकर, श्री. बबन पाटकर , श्री. मकरंद पाटकर, श्री. बाळा वर्देकर, श्री. सुनील पाटकर ,श्री. संतोष देवुलकर, तसेच कसाल मधील समाज बांधव उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments