वांगणीतील बंधाऱ्यांची गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी केली पाहणी
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
सदर बंधार्यांमुळे दोन्ही वाडीतील विहिरींच्या पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होणार असून या पाण्याच्या उपलब्धतेमुळे माड बागायती व अन्य शेतीलाही पाणी उपलब्ध होणार आहे.
वायंगणी येथे घालण्यात आलेल्या या दोन्ही बंधाऱ्यांची वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी पाहणी केली यावेळी वायंगणी सरपंच दत्ताराम उर्फ अवी अरुण दुतोंडकर कृषी अधिकारी सौ. कविटकर आरोग्य विस्तार अधिकारी श्री. सच्चिदानंद तुकाराम परब ग्रामपंचायत अधिकारी (मातोंड) श्री. प्रल्हाद रामराव इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी प्रज्वल नवार ग्रामपंचायत माजी सदस्य सतिश कामत ग्रापंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते
Post a Comment
0 Comments