Type Here to Get Search Results !

गोव्यातून अवैद्य रित्या आणल्या जाणाऱ्या पेट्रोल, डिझेलमुळे महाराष्ट्राचा करोड रुपये महसूल बुडाला तर सिंधुदुर्गातील अधिकृत पेट्रोल पंपांना फटका


गोव्यातून अवैद्य रित्या आणल्या जाणाऱ्या पेट्रोल, डिझेलमुळे महाराष्ट्राचा करोड रुपये महसूल बुडाला तर सिंधुदुर्गातील अधिकृत पेट्रोल पंपांना फटका

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे गोव्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या पेट्रोल , डिझेल मुळे महाराष्ट्र शासनाचा करोड रुपये महसूल बुडवून पर राज्यातील टँकरद्वारे बेकायदेशीर पेट्रोल डिझेलचा पुरवठा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्रोल पंप धारकावर अन्याय केला जात आहे.
गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील सातार्डा येथील पोलीस चेक नाक्यावरून दिवसाढवळ्या राज रोसपणे पर राज्यातील टँकरद्वारे बेकायदेशीर वाहतूक करताना आम्हाला आढळून आले आहेत.
 गोवा राज्यात दारू, पेट्रोल, डिझेलचे दर महाराष्ट्रातील दराहून कमी आहेत. त्यामुळे दारूसह पेट्रोल व डिझेलची वाहतूक सर्रास महाराष्ट्राच्या सीमेत होते. उत्तरप्रदेश, बिहार या परराज्यातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या सीमेत घुसून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सध्या मोठ्या प्रमाणात डिझेल टँकरद्वारे मिनी पंप उभारून हजारो लिटर डिझेलची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील अधिकृत पेट्रोल पंपधारकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.

गोवा राज्यात डिझेल ८९ रुपये लिटर आहे. तर महाराष्ट्रात ९२ रुपये दर आहे. जवळपास दोन ते तीन रुपये एका लिटरमागे या परराज्यातील टोळीला मिळत आहे. महाराष्ट्राचा महसूल हे परराज्यातील रॅकेट बुडवत आहे. या डिझेल विक्री व्यवसायाला कुणाचा वरदहस्त आहे, असा सवाल जिल्हा पेट्रोल पंप मालक चालक असोसिएशनने केला आहे.

एरव्ही गोव्यातून सर्वसामान्य नागरिकाने आपल्यासोबत एक ते दोन दारू बाटल्या आणल्यावर तरी त्यावर नजर ठेवणारी पोलीस यंत्रणा डिझेलची विक्री दिवसाढवळ्या होत असताना त्यांना का रोखत नाही? यामागे कुणाला मलिदा मिळतो आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. याबाबत येत्या दोन दिवसात जिल्हा पोलीस अधीक्षक सौरमकुमार अग्रवाल यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच मत्स्य व बंदरविकास मंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांचीही भेट घेतली जाणार आहे.
गोव्यात दारू, पेट्रोल व डिझेलचे दर महाराष्ट्रापेक्षा कमी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश वाहनधारक गोवा राज्यात जाऊन पेट्रोल, डिझेल भरत आहेत. मात्र, आता उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश भागातील टोळी त्यांच्या राज्यातील मिनी टैंकर या भागात आणून दोन्ही राज्यांच्या सीमेवर खुलेआम पंप उभारल्यागत डिझेल विक्री व्यवसाय करत आहे. असा व्यवसाय करणाऱ्या मध्यपदेशच्या टैंकर व्यावसायिकांना दोन महिन्यापूर्वीच पेट्रोलपंप धारकांनी पकडून समजही दिली होती. तरीदेखील खुलेआम व्यवसाय सुरू आहे. टँकरमधून दरदिवशी तीन ते सहा हजार लिटरचे मिनी टैंकर आणून खाण व्यावसायिकांना डिझेल विक्री करत आहेत.

Post a Comment

0 Comments