Type Here to Get Search Results !

रत्नागिरीत लाचलुचपत विभागाने सरकारी वकीलाला लाच घेताना पकडले


रत्नागिरीत लाचलुचपत विभागाने सरकारी वकीलाला लाच घेताना पकडले

नवप्रभात NEWS / रत्नागिरी 

आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी १,५०,००० रुपये लाच घेताना खेड येथील सरकारी वकीलाला लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.
         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले. चिपळूण येथील ओयासीस हॉटेल येथे यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश जाधव यांनी ५,००,००० रुपयांची मागणी केलेली होती आणि स्वीकारलेली लाच रक्कम १,५०,००० रुपये होती.
        यातील तक्रारदार यांनी खेड तालुक्यातील घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वर्ग १, खेड यांचे न्यायालयात वकीलपत्र घेतलेले आहे. सरकार पक्षाच्यावतीने सदरची केस राजेश जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता हे पाहात होते. दिनांक २६ डिसेंबर २०२४ व दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक राजेश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे साक्षीदारांना शिकवणार नाही, तुमची केस कशी सुटेल, असे प्रयत्न करेन, जास्त उलट तपास न घेता महत्वाचे मुद्दे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील व केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी ५,००,००० रुपयांची मागणी करुन त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १,५०,००० रू. स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झालेले होते. त्यानंतर सापळ्याचे आयोजन करुन लोकसेवक राजेश जाधव यांना तक्रारदार यांच्याकडून १,५०,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments