Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे २६ जानेवारी रोजी ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.


वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे २६ जानेवारी  रोजी ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त  रक्तदान शिबिराचे आयोजन.

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

 हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणी वेंगुर्ला यांच्या वतीने प्राथमिक केंद्र शाळा सुरंगपाणी वांयगणी तळेकरवाडी येथे २६ जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ७६ रक्तदात्यांचे रक्तदान करून घेण्याचा मानस आहे. या शिबिरात रक्तदात्यांना टी-शर्ट आणि महिलांसाठी गृह उपयोगी भेटवस्तू व सन्मानपत्र भेट म्हणून देण्यात येणार आहे. तरी रक्तदान शिबिराच्या या विधायक उपक्रमात आपण स्वतः सहभागी होऊन आपले नातेवाईक हितचिंतक यांनाही  सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणी अध्यक्ष सुमन कामत यांच्या वतीने करण्यात येत आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क 
 सुमन कामत ९४२१२३५११७, हर्षद साळगावकर ९६०७२१३०१६  
प्रवीण राजापूरकर ९४२०७४००७४, 
सुनील नाईक ९४२१२६७८३२

Post a Comment

0 Comments