Type Here to Get Search Results !

सोशल मिडिया वापर काळजी पूर्वक ! करा..प्रा.वैभव खानोलकर


सोशल मिडिया वापर काळजी पूर्वक ! करा..प्रा.वैभव खानोलकर

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

       सोशल मिडियाचा काळजी पुर्वक वापर करा असा सल्ला तरूणाईला प्रा वैभव खानोलकर यांनी दिला कणकवली महाविद्यालयाच्या वतीने  विशेष श्रमसंस्कार शिबिर हरकुळ बुद्रुक येथे दिला ल.गो सामंत विद्यालयात हे व्याख्यान नुकतेच संपन्न झाले.
   खानोली गावचे सुपुत्र असणाऱ्या प्रा खानोलकर यांनी सोशल मिडियावर   लिखाण करताना आपण गरच जागृक असतो का?असा प्रश्न करत आज जागतिक व्यासपीठावर जात ,धर्म,लिंग ,भाषा, प्रांत याबद्दल व्देष पसरवून समाजातील शांतता भंग करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होतो असे सांगताना लहान वयातच सोशल मीडिया हातात आल्यामुळे आणि त्याला हाताळायचं कसं याचं ज्ञान नसल्यामुळे ही मुलं संस्कृत होण्यापेक्षा मनोरुग्न होत चालले. असल्याचे मत व्यक्त केले.
आजच्या तरुण पिढीला ऐश्वर्या रॉयच्या मुलीचं आणि सैफ अली खानच्या मुलाचं नाव अगदी तोंड पाठ आहे परंतु आपल्या देशासाठी प्राण देऊ केलेल्या भगतसिंगांच नाव मात्र यांना आठवत नाही ही तरुण पोरं आज तारुण्याच्या काठावर खूप मरत आहेत परंतु मरणाला निगड्या छातीनं सामोरे गेलेला संभाजी राजांना आठवत नाही. परदेशातही भारताचा पताका उंच फडकवणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे नाव आजही युवाईला आठवत नाही आज संवेदना हरवत चाललेली ही तरुणाई अडीच अक्षरी प्रेमात वेडी झाली आहे आणि एकतर्फी प्रेमातून हल्ले करू लागले ही तरुणाई काय आणि कसा देशाचा विकास करणार? हा केविलवाणा प्रश्न समाज करू लागला आहे. याचा विचार आज आपण तरूण म्हणून करणं गरजेचं असल्याचं म्हटले.
 इथे तरुण एकत्र आले तर स्वराज्य निर्माण होते तिथे तरुण एकत्र आले तर 150 वर्षांची गुलामगिरी नष्ट होते हा भारत देशाचा इतिहास आहे पण यासाठी तरुणांनी एकत्र येणे गरजेचे सोशल मीडियाचा वापर फक्त मनोरंजना पुरता न करता जर या तरुण पिढीने सकारात्मक बाजूने वापरायला सुरुवात केली तरी हीच सोशल मीडिया या देशाच्या व्यवस्थेच्या व्यवस्थित निश्चितच परिवर्तन घडवून आणु शकते. रोजगार कौशल्य ज्ञान आदी गोष्टीत सोशल मीडियाचा वापर  तरुणांना सहाय्यभूत ठरवू शकते हे नाकारून चालणार नाही 
खरं तर सोशल मीडियाच्या बाबतीत तुकाराम महाराजांच्या काही ओळी  प्रकर्षाने सांगताना ते म्हणाले
 "तुका म्हणे दर्पणाचे अंग जाते त्याचे दावी रंग खरं"  सोशल मीडिया हा आपल्या समोर दर्पणाचे अंग घेऊन उभे आहे  आपण त्याच्या समोर सकारात्मक की नकारात्मक अंग घेऊन जातो. त्यावर आपलं प्रतिबिंब अवलंबून आहे आणि म्हणूनच मला आशा आहे जर
 तरुण पिढी सोशल मीडियासमोर योग्य भूमिका घेऊनच उभी राहील आणि मग माझ्या देशाची उजळ प्रतिमा या प्रतिबिंबामध्ये चमकेल असा आशावाद व्यक्त त्यांनी या वेळी व्यक्त केला त्यांच्या व्याख्यानामध्ये काही प्रेरणादायी कथाही उपस्थित विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवरांना भावणारे ठरल्या वैभव खानोलकर हे दशावतारी लोककला अभ्यासक एक सुप्रसिद्ध निवेदक ,मुलाखतकार उपक्रमशील अध्यापक आदी विविध गोष्टीसाठी प्रसिद्ध असून वैभव खानोलकर हे माझे बी.एड्.चे वर्ग मित्र आहेत आणि  याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार प्रा.विजय सावंत यांनी या वेळी व्यासपीठावर काढत खानोलकर यांची स्तुती केली या वेळी व्यासपीठावर कांबळे प्रा. विजय सावंत.प्रा. मनोजकुमार कांबळे.प्रा.मीना महाडेश्वर.प्रा.श्वेता वाळके आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या वैचारिक मंथनातुन उपस्थित युवा पिढी सह प्राध्यापक वर्गावर छाप सोडणाऱ्या खानोलकराचा मानचिन्ह, पुस्तक,बुके देत हरकुळ बुद्रुक येथे गौरव ही करण्यात.

Post a Comment

0 Comments