Type Here to Get Search Results !

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अशोक दाभोलकर सन्मानित.

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अशोक दाभोलकर सन्मानित.

नवप्रभात NEWS / मुंबई 

 श्री दत्तजयंतीच्या शुभदिनी मुंबई येथे संपन्न झालेल्या वंशज विश्वकर्माचे ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सिंधुदुर्गातील दाभोली, वेंगुर्ल्याचे अशोक दाभोलकर सन्मानित.
     सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती विणाताई चारी ह्यानी लिहीलेल्या " व वंशज विश्वकर्माचे" ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साहित्य संघ मंदिर, गिरगांव येथे जेष्ठ साहित्यिक व अमळनेर येथे झालेल्या ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ, रविंद्र शोभणे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

     साहित्य, कला, क्रिडा, संगित, सामाजिक क्षेत्रात सामाजिक मुल्यांचे जतन करीत विश्वकर्मिय समाजाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार्‍या १९ दिग्गज व्यक्तिमत्वांचा जीवन आलेख श्रीमती विणाताईने ह्या पुस्तकात लिहीला असून दाभोली गावचे आंतरराष्ट्रीय शुटिंगबॉल पंच व जेष्ठ खेळ संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर मेस्त्री ह्यांत स्थान मिळविले आहे.

    अशोक दाभोलकर ह्यानी क्रिडा क्षेत्रात विविध पदावर उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आज गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत ग्रामिण शाळांमधून पालक व पाल्याना चर्चासत्र व शिबिराव्दारे कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता खेळसंस्कृतीचा महत्व पटवून देण्याचे काम करीत आहेत.

      त्यांच्या ह्या भरीव कामगिरीबद्दल त्यांचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, संजय कदम, सुरेंद्र सकपाळ, डॉ. श्रीकृष्ण परब, पपू पेडणेकर, विश्वकर्मा सुतार समाजाचे अध्यक्ष श्री. शरद मेस्त्री सौ. अमिदी मेस्त्री आदी मान्यवरानी अभिनंदन केले आहे.
     

Post a Comment

0 Comments