तालुकास्तरीय क्रिडा महोत्सवात शाळा- जामसंडे खाकशीचे दैदिप्यमान यश
नवप्रभात NEWS / देवगड
सन २०२४-२५ अंतर्गत देवगड तालुक्यामध्ये पार पडलेल्या तालुकास्तरीय व शालेय बाल कला, क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवांतर्गत स्पर्धामध्ये जि. प. प्राथमिक शाळा जामसंडे खाकशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
यामध्ये लहान गट - ज्ञानी मी होणार यास्पर्धेत कु. भूषण चौकेकर व कु. कल्पेश कोयघाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच समूह नृत्य लहान गट या स्पर्धेत तो विजेता ठरला. हे दोन्ही संघ जिल्ह्याला देवगड तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी श्री. श्रीरंग काळे, गटसमन्वय श्री अशोक जाध बीटाचे विस्तार अधिकारी श्री. सुदाम जोशी, सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापिका श्रीम. सुमन चोपडे, उपशिक्षिका श्रीम. दिपीका जांभवडेकर, शा. व्य. स. अध्यक्ष श्री. जनार्दन कोयूघाडी व सर्व सदस्य, पालक, ग्रामस्य व केंद्रातील सर्व शिक्षक या सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments