केळूस रांजणवाडी येथील बंधाऱ्यामुळे पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी होणार मदत
ग्रामस्थांच्या सहकार्याने बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटी बसवून पुर्ण योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील केळूस रांजणवाडी येथील घोड्यावर उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे येथील शेतजमीन ओलिताखाली येणार असून लगतच्या विहिरींच्या पाण्याची पातळी देखील टिकून राहण्यासाठी मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे
गोड्या पाण्याची साठवणूक होऊन खाजगी व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची पातळी वाढावी, भुगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, शेती व माड बागायती तसेच गुराढोरांना, पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने केळूस रांजणवाडी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटी ग्रामस्थांच्या सहकार्याने बसविण्यात आल्या त्यामुळे या भागात मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. बंधाऱ्याच्या लोंखडी प्लेटी बसविण्यासाठी प्रसन्ना रांजणकर, स्वातिश रांजणकर, सुनिल रांजणकर, किशोर रांजणकर, आंनद आंदुर्लेकर, विश्वास आंदुर्लेकर यांनी मेहनत घेतली. यावेळी केळूस सरपंच श्री. योगेश शेटये व उपसरपंच श्री. संजीव प्रभु उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments