"ज्ञातीबंधूना एकत्र आणण्यासाठी क्रिकेट स्पर्धा हा योग्य उपक्रम " अशोक दाभोलकर मेस्त्री
नवप्रभात NEWS / मुंबई
नुकत्याच यंग स्टार सुतार संघ, डोबिवली, ठाणे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा पाटील मैदान डोबिवली येथे दिमाखात पार पडली.
विश्वकर्मिय समाज एकत्र यावा म्हणून आयोजित केलेल्या ह्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ नामवंत संघानी भाग घेतला होता.
स्पर्धेचे उदघाटन सर्वश्री विजय सुतार, सुनील नवलकर, श्रीमती रुक्मिणी पांचाळ, स्मिता नवलकर, मिनल तरईकर ह्यांचे शुभहस्ते दिपज्योत लाऊन करण्यात आले.
अतिशय चुरशीने खेळलेल्या या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद श्री विश्वकर्मा अक्षरा आरुस फायटर रायगड संघानी जिंकले, व उपविजेतेपद श्री विश्वकर्मा प्रसन्न सोल्ये व तिसरा क्रमांकावर गतविजेत्या देवगड मळई संघाला समाधान मानावे लागले.
ह्या स्पर्धेत सामनावीर म्हणून तुषार तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक परेश, उत्कृष्ट फलंदाज यश, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रोहितची निवड झाली.
बक्षीस वितरण अनुक्रमे ऍडव्होकेट प्रदीप बावस्कर, अशोक दाभोलकर-मेस्त्री , किरण पांचाळ, विजय सुतार, विशाल सुतार आदी मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले.
ह्या स्पर्धेच्या उत्कृष्ठ आयोजनाबद्दल मंडळाचे कौतुक करताना " मंडळानी क्रिकेट स्पर्धेबरोबरच समाजातील युवकांसाठी अन्य स्पर्धांचे आयोजन करावे जेणे करुन मोठा युवावर्ग एकत्र येईल. " असे मत फेडरेशन पंच व जेष्ठ क्रिडासंस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर मेस्त्री ह्यानी व्यक्त केले.
ह्या सामन्याला पंच म्हणून राकेश व अनिश ह्यानी काम पाहीले तर गुणलेखक व समालोचक म्हणून सचिन पार्टे व वैभव गावडे ह्यानी आपली भुमिका पार पाडली.
ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून प्रणय मेस्त्री, दशरथ मेस्त्री, नंदेश मेस्त्री, मनोहर मेस्त्री, कैलास पांचाळ, गणेश पांचाळ, किरण पा़चाळ, हेमंत पांचाळ, सतिश सुतार, प्रफुल्ल मेस्त्री, किशोर पांचाळ, अमोल सुतार आदी कार्यकारणी सदस्यानी अतोनात मेहनत घेतली.
विशेष म्हणजे ह्या स्पर्धेमधून जमा होणारा संपूर्ण नफा ज्ञातीतील शालेय विध्यार्थ्यांना खर्च केला जातो.
Post a Comment
0 Comments