वेताळ प्रतिष्ठान च्या वतीने शाळांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन
प्रशालांसा साठी समुहनृत्य, समूहगीत गायन, सोलो डान्स,प्रश्न मंजुषा,एकपात्री अभिनय स्पर्धाचे आयोजन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने कला-क्रीडा- सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धात्मक अशा अश्वमेध तुळस मोहोत्सवांतर्गत सलग ११व्या वर्षी शनिवार दिनांक ११ जानेवारी रोजी प्राथमिक शाळांसाठी(इ.१ली ते ४थी) जिल्हास्तरिय समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सदर स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकास रु १५००, ११००, ७००, उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
१ली ते ४थी पर्यंत च्या शाळा वगळून* वरील इयत्तेमधील कोणतीही शाळांसाठी पुढील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारताची लोकपरंपरा' यावर आधारित समूह नृत्य स्पर्धा संपन्न होणार असून सादरीकरण कालावधी कमाल ८.०० मि. आहे. यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ११००,७००,५०० प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे पारितोषिक स्वरूप आहे.
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा चा सादरीकरण कालावधी कमाल ०७.०० मिनिटे असून यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ७००,६००,५०० आणि प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र तर सोलो डान्स स्पर्धेसाठी कमाल सादरीकरण कालावधी २.३०मिनटे असून यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ४४४,३३३,२२२ प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असून, सामान्य ज्ञानावर आधारित *प्रश्नमंजुषा स्पर्धा असून यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ४४४, ३३३, २२२ प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असून शालेय एकपात्री अभिनय स्पर्धा करिता रामायण आणि महाभारतकालीन कोणतीही व्यक्तीरेखा सादर करायची असून सादरीकरण कालावधी कमाल २.०० मिनटे असून यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ५५५,३३३,२२२ प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असून या *पाचही स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या प्रशालेस मानाचा 'वेताळ करंडक' देऊन गौरवण्यात येणार आहे. वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत एका शाळेला एकच संघ किंवा एकच स्पर्धक सहभागी करता येईल. अधिक माहिती व नाव नोंदणी साठी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत प्रा.डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) व गुरुदास तिरोडकर (९४२०७४७२६८) याच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीच जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments