100 दिवस क्षयरोग शोधमोहिमस आजपासून वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथून प्रारंभ
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
दि. ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ या कालावधीत सक्रिय क्षय रुग्ण ६० वर्षा वरील व्यक्ती धूम्रपान करणारी व्यक्ती,मधुमेह व्यक्ती,कमी वजन असणारे व्यक्ती,HIV बाधित व्यक्ती यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
सक्रिय क्षय रुग्णांना मोफत औषधोपचार व पोषण आहार दिला जाणार आहे.यासाठीचा कृती कार्यक्रम तालुकास्तरावरून ठरविण्यात आला आहे.दि. ७ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झालेल्या क्षयरोग शोधमोहीमेस उपजिल्हा रुग्णालय येथून प्रारंभ करण्यात आला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच मार्गदर्शन डॉ. संदीप सावंत अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच श्री एस टी वराडकर STS यांचेही मार्गदर्शन लाभले यावेळी उपजिल्हा रुग्णालय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
टीबी मुक्त भारत २०२५ अभियान यशस्वी करून तालुका तसेच महाराष्ट्र पर्यायी देश टीबी मुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला अधिक्षक डॉ. संदीप सावंत यांनी आवाहन केले आहे
या शोधमोहीमेच्या माध्यमातून क्षयरोगी लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित उपचारा खाली आणणे , क्षयरोग मुळे होणारे मृत्युदर कमी करणे, व नवीन संक्रमण थांबविणे यावर भर दिला जाणार आहे.
Post a Comment
0 Comments