Type Here to Get Search Results !

बांदा येथे 6 ऑक्टोबर रोजी होणार ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा


बांदा येथे 6 ऑक्टोबर रोजी होणार ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा 

     सावंतवाडी 
 नवप्रभात NEWS 

 बांदा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता बांदा ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी बांदा या संस्थेने या मेळाव्याचे आयोजन केले असून यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिक सभासदांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात बांदा पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य व सन्मान प्राप्त व्यक्तींचादेखील सन्मान करण्यात येणार आहे. तरी मेळावा व कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अन्वर खान व सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments