Type Here to Get Search Results !

श्रीनिवास मयेकर शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यात प्रथम

श्रीनिवास मयेकर शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यात प्रथम

योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ला शाळा नं.३ चा विद्यार्थी श्रीनिवास बाबूराव मयेकर हा शिष्यवृत्ती परीक्षेत ८६.५७ टक्के गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम आला आहे. तसेच तो शहरी विभागातून शिष्यवृत्तीधारक ठरला आहे. त्याला मुख्याध्यापक शंकर सावंत, राकेश देसाई, मानसी नाईक, पूनम रेडकर तसेच त्याची आई नम्रता मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारूती कुडाळकर, पालक संघाचे उपाध्यक्ष अमृत काणेकर, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष वेदिका सामंत यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments