Type Here to Get Search Results !

शिक्षणमंत्र्याचा डि.एड् धारकांना दिलास पण बी.एड् धारकांचे काय?ते ही आपले "लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ "आहेत.माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांचा सवाल

शिक्षणमंत्र्याचा डि.एड् धारकांना दिलास पण बी.एड् धारकांचे काय?ते ही आपले "लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ "आहेत.माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांचा सवाल

  योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

थोडं उशीरा का असेना पण शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी डि.एड् धारकांना "थोडी खुषी थोडा गम "असेना का पण दिलासा दिला याबद्दल त्यांचे कौतुक ‌अशा शब्दांत माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी कौतुक केले.
 या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना जिल्हातील डि.एड धारकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.मात्र शिक्षणमंत्री केसरकर यांना बी.एड धारकांचा विसर पडलेले दिसतो असं मत ही जाधव यांनी मिडियाशी बोलताना व्यक्त केले
दहावी, बारावीच्या निकालाच्या बाबतीत महाराष्ट्रात नेहमीच कोकण विभाग आणि विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी आघाडीवर असतात आणि आहेतही. विद्यार्थ्यांच्या यशात मोठा वाटा असतो तो शिक्षकांचा हे विसरून चालणार नाही.
  मंत्रीमहोडू
महोदय केसरकर यांना या बाबतीत आठवण करून द्यावीशी वाटते कि आपण जसे डि.एड् धारकांना सहानुभूती पुर्वक न्याय दिलात तसाच न्याय बी.एड् धारकांना द्यावा कि त्यांच्या आंदोलनाची वाट आपण बघत आहात आणि मगच निर्णय घेणार आहात.आज सिंधुदुर्ग जिल्हात शिक्षणाच्या बाबतीत कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र यांचा विचार करा,खोटी अनुदान लाटणे,खोट्या शाळा दाखवणं, असे प्रकार आपल्या जिल्ह्यात दिसत नाही.तरीही आज शासनाच्या दिरंगाई आणि चाल ढकल धोरणामुळे अनेक वर्षे शिक्षक भरती रखडली आहे,याचा विपरीत परिणाम होतं आहे.आज ही काही  ठिकाणी संस्थेने आपल्या स्तरावर शिक्षक नेमले कारण विध्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. मात्र पवित्र पोर्टल च्या गोंडस नावाखाली आज भरती प्रक्रिया सुरू आहे पण संस्था स्तरावर
नेमलेल्या बी.एड् धारकांच्या भवितव्याचे काय? त्यांचे आयुष्य उध्वस्त होणार नाही का? त्या शिक्षकांनी केलेली सेवा आणि त्याग याचा विचार आपण नाही करणार.संवेदनशील असणाऱ्या दिपक केसरकर यांनी जे शिक्षक संस्थेने घेतलं आहे आणि त्यांना सरसकट सेवेत सामावून घ्यावे आणि जुन २०२४ नंतर झालेल्या सगळी रिक्त पद पवित्र पोर्टल मधुन भरावीत.केसरकर साहेब आपण मनात आणलात तर हाही विषय सोडवू शकतात. नाही आपण तो विषय सोडववाच अशी अपेक्षा आहे यात आपल्या सर्वांच्या "लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ" ही आहेत त्यांना होणार त्रास दूर करायला हवा.
आम्ही अनेक वेळा डि.एड् बी.एड् धारकांच्या विविध आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता मंत्री केसरकर यांनी घेतल्या निर्णयाचे स्वागत करत आहोत.संस्था स्तरावर भरलेले जिल्ह्यातील बी. एड. धारक शिक्षकांना सामावून घेण्यात यावे.अशी मागणी माजी समाजकल्याण सभापती जाधव यांनी शिक्षणमंत्री केसरकर यांचे कडे आहे.

Post a Comment

0 Comments