आई नरसुले हिच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आली
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील आई नरसुले हिच्या ३७व्या पुण्यतिथीनिमित्त ३१ जुलै रोजी वेंगुर्ला ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी आई नरसुले समाधी मंदिराचे व्यवस्थापक मोहनदास नरसुले, ट्रस्टचे विश्वस्त गजानन नरसुले, रमेश नरसुले, शांतीनिकेतन नरसुले, अण्णा रेडकर, गणेश चेंदवणकर, आनंद केरकर, अनिकेत नाईक यांच्यासह रूग्णालयाचे डॉ. शुभम, परिचारिका पी.एफ.डिसोजा यांच्यासह रूग्णालयातील अन्य परिचारिका उपस्थित होते. रूग्णांना फळे वाटप करून धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल रूग्णालयातर्फे नरसुले यांचे आभार मानण्यात आले.
Post a Comment
0 Comments