कुडाळ येथे २७ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नवप्रभात NEWS / कुडाळ
सिधुदुर्ग जिल्हा जैन परिवारातर्फे २७ जुलै रोजी दुपारी ३.३० वा. कुडाळ येथील मराठा मंडळ सभागृहात (कुडाळ हायस्कूलनजीक) समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी डॉ. दीपक तुपकर (९४२२३९४०१०), महावीर मांगले यांच्याकडे २५ जुलैपर्यंत नोंदवावीत. नाव नोंदविताना संबधित विद्यार्थी ज्या परीक्षेत उत्तीर्ण झाला असेल, त्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स घेऊन येणे अथवा गुणपत्रिकेचा फोटो व्हॉटस्अपवर आवश्यक पाठविणे आहे.
Post a Comment
0 Comments