रेशन दुकानदारांना अद्याप लेखी आदेश प्राप्त न झाल्याने रेशन दुकानावर ऑफलाइन पद्धतीने धान्य देण्यास दुकानदारांचा नकार..
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
रेशन दुकानावरील धान्य वितरित करणाऱ्या मशीनचा सर्व्हर डाऊन असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळत नाही. चार- चार वेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यात महिन्याचे दोन दिवस शिल्लक असल्याने सर्व्हर समस्यामुळे नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे सर्व्हर समस्या सुटत नाही तोपर्यंत ऑफलाइन पद्धतीने धान्य देण्यात यावे अशी मागणी सर्वांनीच जिल्हाधिकारी यांचे जवळ लावून धरली होती त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक आश्वासन मिळाले मात्र धान्य वितरण करणाऱ्यांना त्याबाबत कोणतेही लेखी आदेश अद्याप पर्यंत प्राप्त न झाल्याने धान्य दुकानदारांनी ऑफलाइन धान्य देण्यास ग्राहकांना नकार दिला आहे.
धान्य दुकानदारांनी ऑफलाइन धान्य वितरण केल्यास धान्य दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाकडून लेखी आदेश प्राप्त झाल्याशिवाय धान्य वितरण होऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागरिकांना भर पावसाच्या दिवसात शासनाकडून मिळणाऱ्या या धान्यासाठी तीन-चार वेळा पायपीट करून यावे लागते व तासंतास ताटकळत राहावे लागत असल्याने नागरिकांतून तिव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य तोडगा काढून नागरिकांना तात्काळ धान्य वितरण करणे अत्यावश्यक आहे.
Post a Comment
0 Comments