प्रा.वैभव खानोलकर यांनी घेतल्या जेष्ठ रंगकर्मी यशवंत गावडे सह दत्तप्रसाद शेणई यांच्या मुलाखती पालकांसह विद्यार्थी शिक्षकांचा उदंड प्रतिसाद
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 22 जुलै ते 28 जुलै या दरम्यान शैक्षणिक सप्ताह सर्व शाळांमध्ये साजरे केले जात आहेत या शैक्षणिक सप्ताहाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक दिन नुकताच कुडाळ इंग्लिश मिडियम माध्यमिक स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या निमित्ताने दशावतारी कलावंतांना या कार्यक्रमात विशेष आमंत्रित करण्यात आले.
होते
यावेळी दशावतारातील जेष्ठ खलनायक ज्यानी जवळपास 42 वर्ष दशावतार कलाक्षेत्रात आपले जीवन समर्पित केले असे जेष्ठ कलावंत तुकाराम उर्फ अण्णा गावडे आणि वेंगुर्ला मठ गावचे सुपुत्र ,लौकिक प्राप्त कलावंत दत्तप्रसाद शेणई यांना निमंत्रित केले गेले. या दोन्ही कलावंतांच्या मुलाखती लोककला अभ्यासक आणि मुलाखतकार म्हणून प्रसिद्ध असणारे प्रा.वैभव खानोलकर यांनी घेतल्या. दशावतार कलाक्षेत्रातील चढ-उतार, सध्याची आव्हाने, पूर्वीच्या दशावतार, संयुक्त दशावतार ट्रीकसिन संकल्पना, त्याचबरोबर दशावताराच्या मर्यादा, काळानुरूप होणारे बदल या गोष्टी या मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यां समोर उलगडल्या गेल्या .
त्याच बरोबर मुलाखत कशी घेतात ,मुलाखतकार कशा प्रकारे प्रश्न विचारतात, याचाही वस्तू पाठ या मुलाखतीतून विद्यार्थ्यांना मिळाला.
त्याकाळी पायी प्रवास करत दशावतार जिवंत ठेवणाऱ्या खलनायक तुकाराम गावडे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक किस्से या मुलाखतीत सांगितले ते ऐकताना कधी आसू तर कधी हसू अशा प्रकारचा अनुभवाने ही मुलाखत टाळ्याच्या उदंड प्रतिसादात उतोरोत्तर रंगत गेली
मुलाखतीच्या सुरुवातीला शालेय मुलांचे गुणदर्शन कार्यक्रमाने या दुपारच्या सत्राची सुरुवात झाली आर्या नार्वेकर आणि भाग्येश रांजणकर यांनी कथ्थक नृत्याने गणेश वंदना सादर केली त्याच बरोबर लावणी नृत्य, पोवाडा त्याचबरोबर गोंधळ या लोककला प्रकाराने कार्यक्रमाला रंगत आली.
अगदी कमी वेळात उत्तम सादरीकरण करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे दत्तप्रसाद शेणई यांच्या सह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
या वेळी आनंद पुरस्काराचे मानकरी तथा ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील अभिनेता श्रीकांत भिडे यांनीही या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली त्याचा ही सन्मान जेष्ठ रंगकर्मी अण्णा गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. कामत मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रज्ञा जोशी मॅडम यांनी केले तर मान्यवरांची ओळख श्री. लक्ष्मण पवार सर यांनी केली.
कलावंताचे भावविश्व उलगडून विद्यार्थ्यांना स्थानिक लोककलेचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमाचे पालकांनी ही कौतुक केले.
Post a Comment
0 Comments