ॲम्बुलन्सच्या जोरदार धडकेने वेंगुर्ले येथील वीज कर्मचारी बाळा शंभा गावडे यांचे निधन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
ॲम्बुलन्सने जोरदार धडक दिल्याने वेंगुर्ले येथील वीज कर्मचारी बाळा शंभा गावडे यांचे उपचारादरम्यान गोव्यात निधन तर संदेश सत्यवान शिरोडकर हे जखमी झाले आहेत.
बाळा शंभा गावडे अणसुर वय 55 व संदेश सत्यवान शिरोडकर वय 26 होडावडे हे काल सायंकाळी सहा वाजता वीज वितरण कार्यालयात आपल्या कामावर रात्रपाळीसाठी हजर झाले होते. रात्री 11-30 च्यादरम्याने वेंगुर्ले शहरातील गाडीअड्डा येथील प्रमोद केरकर यांच्या विद्युत पुरवठा बंद पडल्याच्या तक्रारी कॉलसाठी बाळा गावडे व संदेश शिरोडकर हे गाडीअड्डा येथे जाण्यासाठी त्यांच्या कडील स्प्लेंडर मोटर सायकल नंबर MH08 S-9068 वरून रवाना झालेले होते मोटार सायकल हे बाला गावडे चालवित होते व संदेश सत्ययान शिरोडकर हे मोटार सायकलच्या पाठीमागे बसलेले होते त्यानंतर रात्री 23.40 याच्या दरम्याने ऑफिसमध्ये परतत असताना हॉस्पिटल नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या ॲम्बुलन्स क्रमांक, MH 07AJ4464 ने भरधाव वेगाने हयगयीने चालवून वीज कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलला जोरात धडक देऊन अपघात केला सदर ॲम्बुलन्स वरील चालकाचे नाव अलबेट तमास डिसोजा - उभादांडा असल्याचे समजून आले.
सदर अपघातात बाळा गावडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच संदेश शिरोडकर याच्या डोक्याला व हाता पायांना गंभीर दुखापती झालेल्या होत्या त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे दाखल केले तेथून त्याना अधिक उपचारासाठी मेडीकल कॉलेज गोवा बांबुळी येथे पाठविण्यात आले गोवा बांबुळी येथे बाळा गावडे व संदेश शिरोडकर यांच्यावर उपचार सुरु असताना बाळा गावडे यांचे उपचारा दरम्यान मध्यरात्री 3.30 वा. च्या सुमारास मयत झालेले आहेत याबाबतची खबर विज वितरण कार्यालयाचे सुरक्षारक्षक सहदेव तांडेल यांनी वेंगुर्ला पोलिसात दिली आहे.
सदर घटना शुक्रवारी रात्री घडलेली असताना सदर घटनेचा पंचनामा रात्री न करता आज सकाळी करण्यात आल्याने या एकूण कारभाराबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे
Post a Comment
0 Comments