Type Here to Get Search Results !

कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये बुधवार दिनांक १७ जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा संपन्न होणार आहे

कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये बुधवार दिनांक १७ जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा संपन्न होणार आहे

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील केळुस कालवीबंदर येथीलश्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये बुधवार दिनांक १७ जुलै  रोजी विविध कार्यक्रमांनी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे.
श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे ५ वाजता पंचामृत स्नान होऊन कार्यक्रमास प्रारंभ होईल.
सकाळी ९ वाजता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दीपोत्सव करून ईश्वराच्या चैतन्य रुपाची अनुभुती घ्यायची असून प्रथमच श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी व भाविकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावयाचा आहे.
 सकाळी ९ ते १२  वाजेपर्यंत श्री विठ्ठल नामाचा जप
दुपारी १ वाजता श्रीकृष्ण वारी वेंगुर्ला चे मंदिरात आगमन दुपारी १ ते २ वाजेपर्यंत भजन,दुपारी २नंतर अल्पोपहार, संध्याकाळी ७ वाजता महिलांचे भजनाचे कार्यक्रम होतील, रात्रो १०.०० वाजता जागर
गुरुवार दिनांक १८ जुलै रोजी पहाटे काकड आरती ने सोहळ्याची सांगता होणार आहे
गणुबुवाच्या कृपाशीर्वादाने यंदाही वेंगुर्ल्यातून श्रीकृष्ण पायी वारी दाभोली नाका येथुन सकाळी ७.०० वाजता  निघेल.
केळुस कालवीबंदर मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये साजरा होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा व श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कालवीबंदर ग्रामस्थांनी केले आहे

Post a Comment

0 Comments