राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांचा इशारा.
उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
राजकारण विरहित सर्वांनी याबाबत विचार करण्याची गरज असून ग्राहकांना पावसाळाच नाहीतर वर्षांचे बाराही महिने विज खंडित होण्याच्या प्रकारांनी ग्रासलेले असून आता पावसाळा सुरू झाल्यापासून रोज विज खंडित होण्याचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे,पण महावितरणचे अधिकारी अतिवृष्टीची कारणे देऊन वीज ग्राहकांची दिशाभूल करण्याचेच काम करत आहे, पावसाळ्याचा सिझन हा दरवर्षी असतो तो फक्त चार महिने पण महावितरण कडे आठ महिने असतात त्या आठ महिन्यांत कोणते उपाय केले जातात,लाईन वरील अडथळा निर्माण होत असलेली झाडे कटींग करण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी महावितरण कंपनी करत असते मग लाईनवर झाडे येतातच कशी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे, गेल्या पंधरा वीस दिवसांतील वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांचा विचार केला तर दिवसा डागडुजीसाठी संपूर्ण दिवस वीज पुरवठा खंडित केला जातो संध्याकाळी सहा सात वाजता वीज पुरवठा सुरू केला जातो आणि एखाद दुसरा तास झाला की पून्हा वीज खंडित होते याला जबाबदार कोण ?आणि हे कशाचे द्योतक ?,कालबाह्य झालेल्या विद्युत वाहिन्या जीर्ण झालेले वीज खांब हीच मुख्य समस्या वीज खंडित होण्याची आहे,पण यावर फक्त मलमपट्टी करण्यातच धन्यता मानणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील ग्राहकांच्या संख्येचा विचार केला तर मेन्टेनन्स साठी महावितरण कंपनीकडे आवश्यक असलेला कर्मचारी वर्गच नाही,जे आहेत ते कॉन्टॅक्ट बेसवर असून प्रत्येक गावातील कामाचा आवाका लक्षात घेता त्या कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांना योग्य सुविधा वेळेत मिळणे कठीण आहे,पण सतत ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते ते स्थानिक वायरमनना, अधिकारी मात्र सुशागत एअर कंडीशन मध्ये बसून असतात, त्यामुळे महावितरण कंपनीने प्रत्येक गावातील वीज ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन आपली कर्मचारी संख्या वाढविणे वीज ग्राहकांच्या दृष्टीने योग्य होईल, तसेच जीर्ण झालेले वीज खांब कालबाह्य झालेल्या विद्युत वाहिन्या बदलण्याची मोहीम हाती घ्यावी,कारण नेहमी प्रमाणे दरवर्षी अतिवृष्टीची कारणे देऊन महावितरण आपली जबाबदारी झटकू शकत नाही,वीज ग्राहकांच्या बिलासाठी जशी तत्परता महावितरण कडून घेतली जाते तशीच तत्परता ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत कसा होईल याची दक्षता घेतली गेली पाहिजे, नपेक्षा महावितरण अधिकाऱ्यां सततच्या तकलादू कारणांचा भांडाफोड करण्यासाठी वीज ग्राहकांना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल याची समज घेऊन महावितरणने आपल्या कार्य शैलीत बदल करून वीज ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत कसा होईल याची दक्षता घ्यावी, नपेक्षा महावितरण विरोधात जनतेमध्ये उद्रेक उफाळून यायला वेळ लागणार नाही,असा गर्भित इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी दिला आहे.
Post a Comment
0 Comments