वेंगुर्ला शहरातील खड्डेमय रस्त्यास केवळ वेंगुर्ला नगरपरिषदच जबाबदार आहे. - ॲड. मनीष सातार्डेकर
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ला शहरातील बहुतांशी रस्ते खड्डेमय झालेले असुन संबंधीत ठेकेदारांना वेंगुर्ला नगरपरिषद पाठीशी घालत असल्याने सदर खड्डेमय रस्त्यांना केवळ वेंगुर्ला
नगरपरिषदेचा भोंगळ कारभार तसेच संबंधीत अधिकारी व ठेकेदार हेच जबाबदारआहेत. असा आरोप सामाजिक कार्यकरते ॲड. मनीष सातार्डेकर यानी केला आहे.
वेंगुर्ला शहरातील बहुतांशी रस्ते खड्डेमय झालेले असुन रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ता हेच कळेनासे झालेले आहे व त्याचा प्रचंड त्रास वेंगुर्ला शहर वासीयांना तसेच वाहनचालक, शाळकरी मुले व पादचारी लोकांना होत असुन या
खड्डेमय रस्त्यामुळे बरेच छोटे-मोठे अपघात झालेले असुन एखादा मोठा अपघात होवून कोणालाही आपला जीव गमवावा लागु शकतो आणि असे झाल्यास त्यास केवळ वेंगुर्ला नगरपरिषद व त्यांचे संबंधीत ठेकेदार तसेच ठेकेदारांना पाठीशी
घालणारे संबंधीत अधिकारी हेच जबाबदार असतील असे मत देखील ॲड. मनीष सातार्डेकर व्यक्त केले आहे.
भुमिगत विजवाहिनी तसेच भुमिगत गॅस पाईप लाईन घालण्यासाठी
शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आलेले होते. सदरचे काम करते वेळी ठेकेदार करत असलेल्या कामावर वेंगुर्ला नगरपरिषदेचा कोणत्याही प्रकाराचा अंकुश नसल्याने
ठेकेदार आपल्या मनमानीप्रमाणे रस्त्यांची खोदाई केलेली असुन खोदलेले रस्ते पुर्ववत करुन घेण्याची जबाबदारी हि वेंगुर्ला नगरपरिषदेची होती. परंतू वेंगुर्ला नगरपरिषदेने याकडे जाणीवपुवर्क दुर्लक्ष केल्याने रस्त्यांचे काम अतिक्षय निकृष्ठ दर्जाचे करण्यात आलेले आहे व खोदलेले रस्ते पुर्ववत करण्यात आलेले नाहीत.
त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडलेले असुन त्याकडे वेंगुर्ला नगरपरिषद जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. वेंगुर्ला नगरपरिषद नियमांचे पालन न करणाऱ्या सर्वसामन्य लोकांवर कारवाही करताना जी तत्परता दाखवते ती तत्परता अशा ठेकेदारांच्या बाबतीत का दाखवत नाही? तसेच अशा ठेकेदारांवर कडक कारवाही का करत नाही? असा प्रश्न वेंगुर्ला शहरातील सर्व सामन्य लोकांना पडलेला असुन वेंगुर्ला न.प. अशा ठेकेदारांवर कोणतीच कारवाही करत नसल्यामुळेच वेंगुर्ला शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झालेले आहेत व त्यास केवळ वेंगुर्ला
नगरपरिषद संबंधीत ठेकेदार व ठेकेदारांना पाठीशी घालणारे नगरपरिषदेचे संबंधीत अधिकारी हेच जबाबदार आहेत. त्यामुळे वेंगुर्ला शहरातील खड्डेमय रस्ते खडी व
डांबर घालून त्वरीत बुझवावेत तसेच खड्यांसाठी जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर व संबंधीत अधिकाऱ्यांवर मुख्याधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाही करावी नाहीतर मुख्याधीकारी यांना शहरवासीयांच्या रोशाला सामोरे जावे लागेल. तसेच सदरचे खड्डे त्वरीत न बुझवल्यास व या खड्यांमुळे कोणाचा जीव गेल्यास त्यास केवळ वेंगुर्ला
नगरपरिषद व ठेकेदारांना पाठीशी घालणारे संबंधीत अधिकारी हेच जबाबदार असतील असा इशार देखील सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनीष सातार्डेकर यांनी दिला
आहे.
Post a Comment
0 Comments